कलाकाराने उपेक्षितांचा आवाज बनले पाहिजे**-उर्गेंन आर्ट फेस्टिवल मधील कलाकार परिसंवादामध्ये ज्येष्ठ कलावंतांचे मत
*कलाकाराने उपेक्षितांचा आवाज बनले पाहिजे* *-उर्गेंन आर्ट फेस्टिवल मधील कलाकार परिसंवादामध्ये ज्येष्ठ कलावंतांचे मत* पुणे : कलाकार म्हणून काम करत असताना आपल्यातील संवेदना कायम जागरूक ठेवल्या पाहिजे . आपण समाजाकडे संवेदनशील नजरेने पाहिले तर आपल्यातील कला अधिक बहरत जाते . समाजाचे केवळ मनोरंजन न करता समाजाला जागृत ठेवून समाजातील उपेक्षित वर्गाचे प्रश्न मांडून त्यांचा आवाज बनण्याचे काम कलाकाराने केले पाहिजे, असे आवाहन चित्रकला नाट्य आधी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांनी केले. करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या उरगेन आर्ट फेस्टिवल फेस्टिवल मध्ये कलाकार परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ,त्यावेळी जेष्ठ कलाकारांनी कलाकार आणि समाजाप्रती असणाऱ्या त्यांच्या भावना व्यक्त केला. ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ चित्रकार मोगलान श्रावस्ती ,ज्येष्ठ चित्रकार सवी सावरकर, ज्येष्ठ रंगकर्मी संजय जीवने आधी या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते. सुधारक ओलवे म्हणाले, पत्रकार म्हणून काम करत असताना माझी परिस्थिती अत्यंत गरी...