पुण्यात पीएनजी ज्वेलर्सकडून 'यू' चे पहिले फ्लॅगशिप स्टोअर सुरूदैनंदिन वापरासाठी आधुनिक आणि कमी वजनाच्या दागिन्यांची नवी ओळख
पुण्यात पीएनजी ज्वेलर्सकडून 'यू' चे पहिले फ्लॅगशिप स्टोअर सुरू
दैनंदिन वापरासाठी आधुनिक आणि कमी वजनाच्या दागिन्यांची नवी ओळख
पुणे, ११ ऑगस्ट २०२६ : पीएनजी ज्वेलर्सने आपल्या नव्याने पुनर्ब्रँडिंग केलेल्या कमी वजनाच्या ज्वेलरी ब्रँड ‘यू’ चे पहिले फ्लॅगशिप स्टोअर हडपसर येथील अमनोरा मॉलमध्ये सुरू केले आहे. १,४४५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे स्टोअर आधुनिक डिझाइन, वैयक्तिक अभिव्यक्ती आणि वेगळेपणाला केंद्रस्थानी ठेवत ग्राहकांना एक खरेदीचा नवा अनुभव देणार आहे.
आजच्या आत्मविश्वासू आणि स्वतःची वेगळी ओळख व्यक्त करणाऱ्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन डिझाइन केलेला यू हा एक समकालीन डायमंड ज्वेलरी ब्रँड आहे, ज्यामध्ये १४, १८, २२ तसेच ९ कॅरेट सोन्यातील हलक्या वजनाच्या फाईन ज्वेलरीचे आकर्षक कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे. आधुनिक सौंदर्यदृष्टी आणि पीएनजी ज्वेलर्सच्या विश्वास व उत्कृष्ट कारागिरीच्या परंपरेला आधुनिक डिझाइनची जोड देत, दैनंदिन वापरासाठी सहज परिधान करता येतील असे बहुपयोगी दागिने या ब्रँडद्वारे सादर करण्यात आले आहेत.
अमानोरा येथील या फ्लॅगशिप स्टोअरची रचना आकर्षक इंटिरियर्स, प्रशस्त मांडणी आणि सुबक डिस्प्लेसह करण्यात आली असून, ग्राहकांना आनंददायी आणि वैयक्तिक खरेदीचा अनुभव मिळेल, याची काळजी घेण्यात आली आहे. येथे अंगठ्या, कानातले, हूप्स, चेन, पेंडंट, ब्रेसलेट, बांगड्या, मंगळसूत्रे तसेच पुरुषांसाठीच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. 'मेड फॉर यू' या संकल्पनेवर आधारित प्रत्येक डिझाइन हलके, बहुपयोगी आणि आकर्षक असून, ग्राहकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सहज अभिव्यक्ती करण्याची संधी देते.
यावेळी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, "‘यू’ च्या पहिल्या फ्लॅगशिप स्टोअरचे उद्घाटन हा पीएनजी ज्वेलर्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आजचे ग्राहक त्यांच्या दैनंदिन जीवनशैली, वैयक्तिक शैली आणि व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असे दागिने पसंत करतात. त्याच अपेक्षा लक्षात घेऊन यू सुरू करण्यात आले असून, पीएनजी ज्वेलर्सने जवळपास दोन शतकांपासून जपलेला विश्वास आणि उत्कृष्ट कारागिरीचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. अमनोरा हे या नव्या ब्रँडची सुरुवात करण्यासाठी योग्य ठिकाण असून, येत्या काही वर्षांत ‘यू’ चा विस्तार देशभर करण्याचा आमचा मानस आहे."
अमानोरा येथील फ्लॅगशिप स्टोअरच्या उद्घाटनासह ‘यू’च्या विस्ताराला सुरुवात झाली असून, टप्प्याटप्प्याने देशभरातील स्टोअर्स या नव्या ब्रँड ओळखीखाली आणण्याची योजना आहे. पीएनजी ज्वेलर्सच्या समृद्ध वारशाचा आणि सर्वसमावेशक ओम्नीचॅनेल धोरणाचा आधार घेत, आधुनिक डिझाइन, परवडणारी लक्झरी आणि ग्राहककेंद्री अनुभवाच्या माध्यमातून भारतातील कमी वजनाच्या फाईन ज्वेलरी क्षेत्रात नवी ओळख निर्माण करण्याचे ‘यू’ चे उद्दिष्ट आहे.
Comments
Post a Comment