*पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी व पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कॉंग्रेस भवन येथे साजरी करण्यात आली.
*पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी व पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कॉंग्रेस भवन येथे साजरी करण्यात आली.*
यावेळी बोलताना *दीप्ती चवधरी* म्हणाल्या की, "राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची आज खरं तर देशाला गरज आहे. समाजातील समता आणि बंधुता या गोष्टी राजर्षी शाहू महाराजांनी समाजाला दिल्या. शिक्षणाचे महत्त्व जाणून राज्यात शिक्षण सक्तीचे केले आणि मुलांना शाळेत न पाठवणाऱ्यांना दंड केला. आरक्षणाचे जनक म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. दलित व मागासवर्गीयांना प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. राजर्षी शाहू महाराजांचे विचारच या समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगी आहेत."
यानंतर पूर्व विभागाचे अध्यक्ष *प्रशांत जगताप* म्हणाले की, ‘‘छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पेरलेले शिक्षणाचे रोप आज वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहे. आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून ते झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते छत्रपती शाहू महाराजांनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुठले. शेकडो वर्षे ज्ञान, सत्ता, संपत्ती या पासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता. अशा राष्ट्रपुरूषाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होवू शकत नाही.’’
Comments
Post a Comment