हिरो मोटोकॉर्पकडून ऑल-न्यू पॅशन+ डिस्क लाँचस्मार्ट तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कामगिरीसह आयकॉनिक मोटरसायकल नव्या धाडसी अवतारात सादर
हिरो मोटोकॉर्पकडून ऑल-न्यू पॅशन+ डिस्क लाँच
स्मार्ट तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कामगिरीसह आयकॉनिक मोटरसायकल नव्या धाडसी अवतारात सादर
हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल आणि स्कूटरच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज ऑल-न्यू पॅशन+ डिस्कच्या लाँचची घोषणा केली. हे स्टायलिश आणि वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेले नवीन व्हेरिएंट आहे, जे रोजचा प्रवास करणाऱ्या राइडर्सना आधुनिक गतिशीलतेचे पर्याय उपलब्ध करून देण्याप्रती कपंनीच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते. शहरी भागातील प्रवास आणि दैनंदिन उपयुक्तता लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या या मोटरसायकलमध्ये कामगिरी, इंधन कार्यक्षमता आणि सोयीस्करता यांचे उत्तम संयोजन आहे, ज्यामुळे नवीन पिढीच्या राइडर्ससाठी ही मोटरसायकल उत्तम पर्याय ठरते.
या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा म्हणाले, "ऑल-न्यू पॅशन+ डिस्कचे लाँच भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आयकॉनिक मोटरसायकल ब्रँड म्हणून पॅशनचा वारसा अधिक दृढ करते. आकर्षक नवीन स्टाइल, प्रगत डिजिटल वैशिष्ट्ये, फ्रंट डिस्क ब्रेकमुळे मिळालेली उत्तम सुरक्षा आणि नेहमीची विश्वासार्ह इंधन कार्यक्षमता यांसह पॅशन+ डिस्क आजच्या सजग ग्राहकांसाठी परिपूर्ण पॅकेज आहे. आम्हाला विश्वास आहे की, हे नवीन व्हेरिएंट ब्रँडचे आकर्षण वाढवेल आणि या सेगमेंटमधील हिरो मोटोकॉर्पचे वर्चस्व अधिक दृढ करेल."
आधुनिक स्टाइल आणि आकर्षक डिझाइन
ऑल-न्यू पॅशन+ डिस्क एका नव्या आणि आधुनिक डिझाइनसह बाजारपेठेत आली आहे, जी पॅशन ब्रँडचा मूळ ऐतिहासिक वारसा कायम ठेवत आजच्या शहरी प्रवाशांच्या वाढत्या आकांक्षा सादर करते. या मोटरसायकलचे प्रिमियम आकर्षण आणखी वाढवण्यासाठी या मोटरसायकलमध्ये फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, जे आधुनिक आकर्षकता आणि प्रगत कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन देते. तसेच कनेक्टेड आणि तंत्रज्ञान-केंद्रित राइडिंग अनुभवासाठी प्रगत इंटरफेस देण्यात आला आहे.
उत्कृष्ट कामगिरी आणि कार्यक्षमता
ऑल-न्यू पॅशन+ डिस्कमध्ये हिरो मोटोकॉर्पचे अत्यंत विश्वासार्ह आणि इंधन-कार्यक्षम १००सीसी क्षमतेचे, बीएस-६ आणि ओबीडी-२ फेज ए प्रमाणित इंजिन देण्यात आले आहे, जे ८००० आरपीएमवर ५.९ केडब्ल्यू पॉवर आणि ६००० आरपीएमवर ८.०५ एनएम टॉर्क निर्माण करते. दैनंदिन प्रवासासाठी डिझाइन केलेली ही मोटरसायकल विविध प्रकारच्या रस्त्यांवर उत्तम गती, दर्जेदार राइडिंग आणि विश्वासार्ह कामगिरी प्रदान करते. कंपनीच्या पेटंट असलेल्या आय३एस (इडल स्टॉप-स्टार्ट सिस्टम) तंत्रज्ञानामुळे ही मोटरसायकल प्रतिलीटर ७१ किमी उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता (मायलेज) देते, ज्यामुळे रोजचा प्रवास करणाऱ्यांसाठी कामगिरी आणि बचत यांचे उत्तम संयोजन मिळते.
स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे सक्षम सुरक्षितता
राइडरचा आत्मविश्वास आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी ऑल-न्यू पॅशन+ डिस्कमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे, जो वेगवेगळ्या रस्त्यांवर अधिक अचूक, जलद आणि खात्रीशीर ब्रेकिंग कामगिरी प्रदान करतो. खऱ्या अर्थाने तंत्रज्ञान-सज्ज राइडिंगचा अनुभव देण्यासाठी या नवीन व्हेरिएंटमध्ये फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह अनेक प्रगत वैशिष्ट्ये दिली आहेत, ज्यामध्ये रिअल टाइम मायलेज इंडिकेटर (आरटीएमआय), कॉल व एसएमएस अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, सर्व्हिस रिमाइंडर, लो फ्युएल इंडिकेटर, ट्रिप मीटर, स्पीडोमीटर आणि ओडोमीटर रिडिंग्जचा समावेश आहे. या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी आणि कमी प्रकाशात उत्तम दृश्यमानता मिळण्यासाठी मोटरसायकलमध्ये शक्तिशाली एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आला आहे. राइडरच्या सुरक्षिततेला अधिक दृढ करण्यासाठी या मोटरसायकलमध्ये इंजिन कट-ऑफसह साइड स्टँड इंडिकेटर देण्यात आला आहे, जो साइड स्टँड लावलेला असताना मोटरसायकल पुढे जाण्यापासून रोखतो.
सुविधा आणि आरामदायी प्रवास
दैनंदिन प्रवास सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेल्या ऑल-न्यू पॅशन+ डिस्कमध्ये उत्कृष्ट अर्गोनॉमिक्स आणि मऊ व आरामदायी सीट देण्यात आली आहे, ज्यामुळे राइडर आणि पाठीमागे बसणारी व्यक्ती (पिलियन) दोघांनाही प्रवास करणे अत्यंत सोयीचे होते. आरामदायक राइडिंग ट्रँगलमुळे राइडरला थकवा न जाणवणारी नैसर्गिक बसण्याची स्थिती मिळते, ज्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासही सुखकर होतो. राइडरच्या सुविधेमध्ये अधिक भर करत या मोटरसायकलमध्ये स्टोरेजकरिता प्रशस्त युटिलिटी केस आणि प्रवासादरम्यान कनेक्टिव्हिटीसाठी एक इन-बिल्ट यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे.
रंग आणि किंमत
या आधुनिक स्टाइलला अधिक आकर्षक बनवण्यासाठी पॅशन+ डिस्क हेवी ग्रे, नेक्सस ब्लू, डार्क इंडस्ट्रियल ग्रे आणि पर्ल रेड या ४ आकर्षक ड्युअल-टोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. हे नवीन व्हेरिएंट देशभरातील हिरो मोटोकॉर्पच्या डीलरशिप्सवर रु. Rs. 84,128/- (एक्स-शोरूम, दिल्ली) या किमतीत उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment