मनोहारी मैत्र संघातर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या सन्मानार्थ व्याख्यानमाला सुधीर गाडगीळ यांना डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्कार
मनोहारी मैत्र संघातर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या सन्मानार्थ व्याख्यानमाला
सुधीर गाडगीळ यांना डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्कार
पुणे : सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनोहारी मैत्र संघ, पुणेतर्फे डॉ. श्रीपाल सबनीस सन्मान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बुधवार, दि. १ जुलै रोजी गुंफले जाणार आहे. या निमित्ताने डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्काराने ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांचा गौरव जाणार आहे, अशी माहिती मनोहारी मैत्री संघाचे प्रमुख मनोहर कोलते यांनी आज (दि. २६) पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. व्याख्यानमालेचा विषय ‘वारकरी संप्रदाय व सनातन धर्म’ असा आहे. या प्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक, महावितरणचे संचालक राजेंद्र पवार, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाल सबनीस असणार आहेत. सरहद संस्थेचे संघटक लेशपाल जवळगे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
डॉ. श्रीपाल सबनीस हे विवेकवादी विचारवंत, साहित्यिक असून त्यांची महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर विविध विषयांवर असंख्य व्याख्याने होत असतात. बहुआयामी व बहुसांस्कृतिक भूमिका असणारे ते एकमेव लोकप्रिय व्यासंगी वक्ते आहेत. त्यांच्या साक्षीने व्याख्यानमाला सुरू होणे व कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान होणे याच हेतूने त्यांच्या सन्मानार्थ व्याख्यानमाला व संस्कृती सेवा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे. वर्षातून तीन वेळा असा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
Comments
Post a Comment