दुसऱ्या पीवायसी लोहिया जैन मालपाणी स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत जोग स्पिअर्स, कटक्कर शार्क्स, नेव्हीटास ॲक्वा माओरीज संघांनी उदघाटनाचा दिवस गाजवला
दुसऱ्या पीवायसी लोहिया जैन मालपाणी स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत जोग स्पिअर्स, कटक्कर शार्क्स, नेव्हीटास ॲक्वा माओरीज संघांनी उदघाटनाचा दिवस गाजवला
पुणे, 7 जून 2026- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित दुसऱ्या पीवायसी लोहिया जैन मालपाणी स्विमिंग लीग स्पर्धेत पहिल्या दिवशी जोग स्पिअर्स, कटक्कर शार्क्स, नेव्हीटास ॲक्वा माओरीज या संघांनी सुरेख कामगिरी बजावत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या स्विमिंग पूल या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी काव्या पारेख, मल्हार जोशी, पार्थ सुर्डीकर यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर जोग स्पिअर्स संघाने ६४ गुणांसह आघाडी प्राप्त केली. तर, अनिका कटक्कर, विश्वेश कटक्कर, कौस्तुभ राडकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कटक्कर शार्क्स संघाने ६२ गुणांसह दुसरे स्थान गाठले. नेव्हीटास ॲक्वा माओरीज ५८ गुणांसह तिसरे स्थान मिळवले.
25मी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात 10 वर्षांखालील गटात जोग स्पिअर्सच्या काव्या पारेखने(25.53से) वेळ नोंदवत प्रथम स्थान मिळवले. 50मी ब्रेस्टस्ट्रोकमध्ये 13 वर्षांखालील गटात सीबीज ॲक्वा टायटन्सच्या आर्ना तापडिया(57.47से,) हिने प्रथम क्रमांक पटकावला. 50मी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात 30 वर्षांखालील गटात नेव्हीटास ॲक्वा माओरीजच्या नील गोवईकर(46.44से,) याने पहिला क्रमांक पटकावला.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे आणि क्लबचे सह सचिव सारंग लागू, लोहिया जैन मालपाणी प्रॉपर्टीजचे पुरषोत्तम लोहिया आणि नितीन मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या स्विमिंग विभागाचे सचिव शिरीष साठे, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे आदी उपस्थित होते.
निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार:
25मी ब्रेस्टस्ट्रोक (10 वर्षांखालील): 1. काव्या पारेख (25.53 से, जोग स्पिअर्स), 2. परम मडकेकर (30.80 से, नेव्हीटास ॲक्वा माओरीज), 3. सिद्धार्थ रानडे(32.48से, कटक्कर शार्क्स);
25मी फ्रीस्टाइल (10 वर्षांखालील): 1. सिया नायर (19.98 से,नेव्हीटास ॲक्वा माओरीज), 2.आर्ना गद्रे (22.10से, एलजेएम ॲक्वा वॉरियर्स), 3.अस्मी बर्वे (22.52से,जोग स्पिअर्स);
50मी ब्रेस्टस्ट्रोक(13 वर्षांखालील): 1.आर्ना तापडिया(57.47से,सीबीज ॲक्वा टायटन्स), 2.शॉन सुपनेकर(58.98से,बेल्फिन्स टायगर्स), 3.आर्या गोसावी(01.00.62से, कटक्कर शार्क्स);
50मी फ्रीस्टाइल(13 वर्षांखालील): 1.अनिका कटक्कर(33.42से, कटक्कर शार्क्स), 2.ऋषी पल्लोड(49.15से.,नेव्हीटास ॲक्वा माओरीज), 3.तालिसा लुंकड(50.54से.,जोग स्पिअर्स);
50मी ब्रेस्टस्ट्रोक(17 वर्षांखालील): 1.रोनव चाफळकर(43.85से, बेल्फिन्स टायगर्स), 2.सारा कटक्कर(49.35से, कटक्कर शार्क्स), 3.दिव्यांका भोसले(50.15से, सीबीज ॲक्वा टायटन्स);
50मी फ्री स्टाईल (17 वर्षांखालील): 1. मल्हार जोशी (35.31से, जोग स्पिअर्स), 2.ऋचा मुजुमदार (36.95से, बेल्फिन्स टायगर्स), 3.शनाया चाफळकर (37.75 से., सीबीज ॲक्वा टायटन्स);
50मी ब्रेस्टस्ट्रोक(30 वर्षांखालील): 1.नील गोवईकर(46.44से,नेव्हीटास ॲक्वा माओरीज), 2.चिनार ओक(47.86से,बेल्फिन्स टायगर्स), 3.राजस ताटके(52.08से,कटक्कर शार्क्स);
50मी फ्रीस्टाइल (30 वर्षांखालील): 1.पार्थ सुर्डीकर (29.94 से, जोग स्पिअर्स), 2.रणवीर भोसले (31.99से, सीबीज ॲक्वा टायटन्स), 3.पार्थ केळकर (34.58से, एलजेएम ॲक्वा वॉरियर्स);
50मी ब्रेस्टस्ट्रोक (50 वर्षांखालील पुरुष): 1.विश्वेश कटक्कर(37.59से, कटक्कर शार्क्स), 2. सिद्धांत पवार(43.66से, एलजेएम ॲक्वा वॉरियर्स), 3. कपिल त्रिमल(44.14से,बेल्फिन्स टायगर्स);
50मी फ्रीस्टाइल (50 वर्षांखालील पुरुष): 1.कौस्तुभ राडकर(27.04से, कटक्कर शार्क्स), 2.श्रीनिवास चाफळकर(30.20से, सीबीज ॲक्वा टायटन्स), 3.पुष्कराज चाफळकर(32.73से, बेल्फिन्स टायगर्स);
50मी ब्रेस्टस्ट्रोक(50 वर्षांखालील महिला): 1.नुपूर गाडगीळ(57.13से,सीबीज ॲक्वा टायटन्स), 2.शोभा दाते(01.03.07से.,जोग स्पिअर्स), 3.मृणालिनी मेहेंदळे(01.03.64से, बेल्फिन्स टायगर्स).
Comments
Post a Comment