एच2इ पॉवर सिस्टीम महाराष्ट्र 24व्या एलबीएचएम 7 वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर लिया कृष्णन, नीरजा महाजन, तनिष्का जैन, इवान दुबे, आकाश श्रीवास्तव हे संयुक्तरीत्या आघाडीवर



एच2इ पॉवर सिस्टीम महाराष्ट्र 24व्या एलबीएचएम 7 वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर लिया कृष्णन, नीरजा महाजन, तनिष्का जैन, इवान दुबे, आकाश श्रीवास्तव हे संयुक्तरीत्या आघाडीवर 

पुणे, 30 मे 2026: आर्यन्स बुद्धिबळ अकादमी यांच्या तर्फे व सिंहगड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संलग्नतेने एच2इ पॉवर सिस्टीम महाराष्ट्र 24व्या एलबीएचएम 7 वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात लिया कृष्णन, नीरजा महाजन, तनिष्का जैन यांनी तर, मुलांच्या गटात इवान दुबे, आकाश श्रीवास्तव यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून 4 गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी प्राप्त केली आहे.

सिंहगड इन्स्टिटयूट, वडगाव, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात चौथ्या फेरीत लिया कृष्णनने अनहिता महाजनचा, तर, नीरजा महाजनने हिंदवी पाटीलचा पराभव करून 4गुण प्राप्त केले. तनिष्का जैनने राद्मी कुलकर्णीवर विजय मिळवत 4गुण मिळवले. 

मुलांच्या गटात इवान दुबेने लोकेश गौरला पराभूत केले व 4 गुणांची कमाई केली. आकाश श्रीवास्तव याने विराज कदमचा पराभव करून 4 गुण मिळवले. याआधी स्पर्धेचे उद्घाटन सिंहगड अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग कोंढवा व डायरेक्टर सिंहगड स्पोर्ट्स असोसिएशनचे संचालक व व्हाईस प्रिन्सिपल डॉ. नचिकेत गायकवाड, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल चे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीसीसीचे संयोजन सचिव राजेंद्र शिदोरे, पीडीसीसीचे सदस्य केतन खैरे, स्पर्धा संचालक नागनाथ हलकुडे, चीफ आरबीटर विनिता श्रोत्री, डेप्युटी चीफ आरबीटर श्रद्धा विंचवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: चौथी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार: खुला गट:
इवान दुबे(4गुण) वि.वि.लोकेश गौर(3गुण);
विराज कदम(3गुण) पराभूत वि.आकाश श्रीवास्तव(4गुण);
इव्यान पटेल(4गुण) वि.वि.सर्वम मेहता(3गुण);
आरव राठी(3गुण) पराभूत वि.निश्वंत रामकुमार(4गुण);
रौनक राठी(3गुण) पराभूत वि.अद्विक वर्मा(4गुण);
मेधांश बांगर(4गुण)वि.वि.सक्षम शहा(3गुण);
रिद्धेश कुलकर्णी(4गुण) वि.वि.रिचार्ड बेंडीस(3गुण);
आवीर शहा(3गुण) पराभूत वि.क्षिव चाकवे(4गुण);
अधिराज चव्हाण(3गुण)पराभूत वि.अद्विक सुखदेव(4गुण);
युवान नेमा(2.5गुण) पराभूत वि.अनिश अगरवाला(3.5गुण);

मुली:
अनहिता महाजन(3गुण) पराभूत वि.लिया कृष्णन(4गुण);
नीरजा महाजन(4गुण)वि.वि.हिंदवी पाटील(3गुण);
राद्मी कुलकर्णी(3गुण) पराभूत वि.तनिष्का जैन(4गुण);
आद्या शेट्टी(3गुण) पराभूत वि.आदिती कोरडे(4गुण);
आभा देशमुख(3.5गुण) वि.वि.आहि मेश्राम(2गुण);
आभा पेशकर(2गुण) पराभूत वि.आशिता कुमारी(3गुण);
साची चांडक(2गुण)पराभूत वि.रुन्वी रणदिवे(3गुण);
एलेनोर डिसुझा(3गुण) वि.वि.सारा पारुंदेकर(2गुण);
सुमुखी गोखले(3गुण) वि.वि.दिविजा सालेचा(2गुण).





Comments