स्थूलतेवर मात करण्यासाठी एमक्युअरच्यावतीने पोविझ्ट्रा इंजेक्शच्या सुरुवातीच्या डोसमध्ये तब्बल ५५ टक्क्यांनी कपात


स्थूलतेवर मात करण्यासाठी एमक्युअरच्यावतीने पोविझ्ट्रा इंजेक्शच्या सुरुवातीच्या डोसमध्ये तब्बल ५५ टक्क्यांनी कपात

 

o सर्व करारांची पूर्तता करत पोविझ्ट्रा हे पेनवर आधारित इंजेक्शन केवळ ९९९ प्रति आठवडा किंवा ३,९९९ प्रति महिना या माफक उपलब्ध होईल.

o पोविझ्ट्राच्या सर्व डोसच्या किंमतीत सरासरी ४७ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

 

पुणे, 15 एप्रिल २०२६: एमक्युअर फार्मास्टुटिकल्स लिमिटेड (BSE: 544210, NSE: EMCURE)

या प्रसिद्ध औषध निर्मात्या कंपनीने वजन व्यवस्थापननासाठी उपयुक्त असलेल्या ‘पोविझ्ट्रा’ या सेमाग्लुटाइड इंजेक्शनच्या किंमतीत भारतात कपात घोषणा केली आहे. सुधारित किंमतीनुसार, आता हे औषध दरमहा ३ हजार ९९९ रुपयांपासून (४ साप्ताहित डोससाठी) उपलब्ध होणार आहे. हे अत्याधुनिक सेमाग्लुटाइड औषध एका आधुनिक पेन डिव्हाइसच्या स्वरुपात उपलब्ध असून, रुग्णांना ०.२५ मिग्रॅ,०.५ मिग्रॅ,१.० मिग्रॅ,१.७ मिग्रॅ आणि २.४ मिग्रॅ (मेंटेनन्स डोस) अशा स्वरुपातील डोस वापरता येतील. या अत्याधुनिक पेन यंत्रणेमुळे रुग्णांना स्वतःहून औषध घेणे अतिशय सोपे झाले आहे. या सोयीमुळे शिवाय रुग्णांनाही योग्य प्रमाणात डोस मिळण्याची खात्री मिळते.

 

नोवो नॉर्डिस्कच्या सेमाग्लुटाइड या स्थूलपणावरील इंजेक्शनचा ‘पोविझ्ट्रा’ हा दुसरा ब्रँड आहे. भारतात ‘पोविझ्ट्रा’ ब्रॅण्डचे इंजेक्शन वितरित आणि विक्री करणारी एमक्युर ही पहिली भारतीय कंपनी आहे. सुधारित आवृत्ती आणि किंमतीत घट यासह खात्रीशीर उपचार जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचवणे, हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाद्वारे देशातील अधिकाधिक रुग्णांना या प्रगत उपचार पद्धतीचा लाभ घेता यावा, रुग्णांना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी एमक्युअर प्रयत्नशील आहे.

 

 

Dosage

Old Monthly Price (MRP incl. Taxes)

Revised Monthly Price (MRP incl. Taxes)

Poviztra® 0.25 mg

8,790/-

3,999/-

Poviztra® 0.5 mg

11,200/-

4,999/-

Poviztra® 1 mg

11,200/-

5,999/-

Poviztra® 1.7 mg

13,000/-

7,999/-

Poviztra® 2.4 mg

15,000/-

8,999/-

 

हे सुधारित दर ३ एप्रिलपासून लागू होतील. किंमतीत घट झाल्याने स्थूलपणाशी झगडणा-या रुग्णांना हे अत्याधुनिक स्वरुपातील औषध सहजरित्या आणि परवडणा-या दरात उपलब्ध होईल. देशात स्थूलतेच्या समस्याशी झगडणा-रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, हे इंजेक्शन त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. सबळ क्लिनिकल पुरावे आणि प्रत्यक्ष वापराचे यशस्वी परिणाम यामुळे हे मूळ स्वरुपातील औषध सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल. देशात स्थूलतेच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सार्वजनिक आरोग्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत एमक्युअरने हे इंजेक्शन अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करुन दिल्याने या रुग्णांना आपले आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

 

हे नावीन्यपूर्ण बायोलॉजिक आर-डीएनए सेमाग्लुटाइड औषध गेल्या जवळपास एका दशकापासून जागतिक बाजारपेठेत उपलब्ध आहे. जगभरात सर्वाधिक संशोधन व उपयुक्त ठरलेल्या औषधाच्या वापरासाठी तब्बल ४ कोटी ९० लाखांहून अधिक पेशंट इयर्सचा अनुभव उपलब्ध आहे. विविध वैद्यकीय संशोधनातील तब्बल ५० क्लिनिकल चाचण्यांच्या आधारे या औषधाची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध झाली आहे. जगभरातील लाखो रुग्णांना या औषधाच्या सेवनाने अपेक्षित परिणाम दिसून आला आहे. परिणामी, हे औषध जागतिक स्तरावर विश्वसनीय उपचारपद्धती म्हणून नावाजली गेली आहे.

एमक्युअर फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “पोविझ्ट्रा ही शास्त्रीयदृष्ट्या वजन व्यवस्थापनावर सिद्ध झालेली उपचारपद्धती आहे. या इंजेक्शनच्या किंमतीतील घट ही सर्वसामान्य रुग्णांना परवडणा-या दरात उपचार उपलब्ध व्हावे, याकरिता आहे. घटत्या किंमतीमुळे हे औषध रुग्णांना सहज उपलब्ध होईल, या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. देशात स्थूलतेच्या समस्येने अनेक रुग्णांना ग्रासले आहे. सुमारे २५.४ कोटी रुग्णांना स्थूलतेचा सामना करावा लागत आहे. तर ३५.१ कोटी लोकांना पोटाचा वाढता घेर सतावत आहे. वाढत्या आजारपणात, सेमाग्लुटाइडसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त औषध मोठ्या स्तरावर उपलब्ध करुन देणे, हे सार्वजनिक आरोग्यासमोरील आव्हानाला तोंड देण्याची अत्यावश्यक ठरते.”

 

स्थूलता हा केवळ वाढत्या वजनासंबंधित समस्या नाही आहे. स्थूलतेमुळे हृदयविकार, मधुमेह टाइप-२, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार, गुडघ्यांची सांधेदुखी, पीसीओएस, मूत्रपिंडाचे आजार यासह अल्झायमर या भयावह आजारांसारख्या तब्बल २३० आजारांचा सामना करावा लागतो. ही धोक्याची घंटा लक्षात घेता, एमक्युअर फार्माने औषधाच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे भारतातील वाढत्या स्थूलतेचे प्रमाण कमी करणे आणि जास्तीत जास्त रुग्णांना हे अत्याधुनिक उपचार उपलब्ध करुन देणे, या उपचारांचे दर आटोक्यात ठेवून रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, ही कंपनीची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

 


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य