पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, प्रतिनिधी – पुणेकरांनी मागील निवडणुकीत कारभारी बदलण्याचा स्पष्ट संदेश दिला असून, यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढत असून सत्तास्थापनासाठी कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. निकालात भाजपला १२० ते १२५ जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. निवडणूक मतदान समाप्तीनंतर प्रभाग क्रमांक २५ मध्ये स्वरदा बापट यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मोहोळ यांनी आमदार हेमंत रासने यांच्यासह उमेदवार व कार्यकर्त्यांसोबत ‘भेळ भत्ता’ करत आनंद साजरा केला. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, भाजपमध्ये वर्षानुवर्षे एक परंपरा आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर सर्वजण एकत्र येऊन भेळ भत्ता करतात. कसबा मतदारसंघात यंदा हा कार्यक्रम घेण्यात आला असून ही जुनी परंपरा संघटनेतील एकतेचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले, निवडणुकीत काहींना संधी मिळते तर काहींना मिळत नाही, मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करतात. प्...