आडकर फौंडेशनतर्फे मंगळवारी दत्तात्रय अत्रे यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

आडकर फौंडेशनतर्फे मंगळवारी 
दत्तात्रय अत्रे यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

पुणे : आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक, विचारवंत, लेखक, गुरुवर्य दत्तात्रय अत्रे (देहू) यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. अत्रे यांचा सन्मान डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य