*डॉ. कामठे पाईल्स क्लिनिकला एटॅबची मान्यता*आयुर्वेदिक प्रॉक्टोलॉजी प्रशिक्षणाला चालना ; क्षारकर्म, अग्निकर्म व क्षारसूत्र अभ्यासक्रमांना अधिकृत परवानगी
*डॉ. कामठे पाईल्स क्लिनिकला एटॅबची मान्यता*
आयुर्वेदिक प्रॉक्टोलॉजी प्रशिक्षणाला चालना ; क्षारकर्म, अग्निकर्म व क्षारसूत्र अभ्यासक्रमांना अधिकृत परवानगी
पुणे : आयुर्वेदिक प्रशिक्षण व प्रॉक्टोलॉजी क्षेत्रातील उच्च दर्जाच्या कार्याची दखल घेत डॉ. कामठे पाईल्स क्लिनिक, पुणे यांना क्षारकर्म, अग्निकर्म व क्षारसूत्र अभ्यासक्रमांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. आयुर्वेदा ट्रेनिंग अॅक्रेडिटेशन बोर्ड (एटॅब), राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, आयुष मंत्रालयाकडून अधिकृत मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
या मान्यतेमुळे संस्थेला आता क्षारकर्म व अग्निकर्म (आधुनिक दृष्टिकोनासह) तसेच क्षारसूत्र या विषयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. विशेषतः क्षारसूत्र अभ्यासक्रम हा तीन महिन्यांचा हायब्रिड स्वरूपात राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण मिळणार आहे.
उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे झालेल्या कार्यक्रमात आयुषचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सचिव राजेश कोटेचा, एनसीआयएसएम अध्यक्षा मनीषा कोठेकर, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचे अध्यक्ष देवेंद्र त्रिगुणा हे उपस्थित होते.
डॉ. कुणाल कामठे म्हणाले, प्रॉक्टोलॉजी विषयात शिक्षण घेऊन प्रत्यक्ष प्रॅक्टिस करू इच्छिणाऱ्या डॉक्टरांसाठी ही एक उत्तम संधी असून, या अभ्यासक्रमांद्वारे एटॅब मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळणार आहे. आयुष क्षेत्रातील डॉक्टरांनी या संधीचा लाभ घेत आयुर्वेदिक प्रॉक्टोलॉजिस्ट म्हणून प्रगत प्रशिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आयुष डॉक्टर झाल्यानंतर अनेकांना प्रॉक्टोलॉजी ची प्रॅक्टीस करायची असते. परंतु यासाठी चांगल्या प्रशिक्षण केंद्राची गरज असते. हे चांगले प्रशिक्षण केंद्र आम्ही उपलब्ध करून देत आहोत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची मान्यता असणार हा कोर्स आहे. त्यामुळे आयुष मान्यताप्राप्त असणाऱ्या या कोर्सचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा.
Comments
Post a Comment