सॅमसंगसोबत साजरी करा शुभ अक्षय्य्य तृतीया: बीस्‍पोक एआय घरी आणा आणि मिळवा खात्रीशीर रिवॉर्ड्स

सॅमसंगसोबत साजरी करा शुभ अक्षय्य्य तृतीया: बीस्‍पोक एआय घरी आणा आणि मिळवा खात्रीशीर रिवॉर्ड्स
 
● बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक आणि इतर फायदे मिळवा
● एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी, सोबत सॅमसंग केअर+ चे विस्तारित वॉरंटी फायदे 

सॅमसंगतर्फे ‘शुभ अक्षय्य तृतीया सेल’ जाहीर 
पुणे, १६ एप्रिल, २०२६ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या शुभ अक्षय्य तृतीया सेलची घोषणा केली आहे. या सेलच्या निमित्ताने सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय होम अप्लायन्सेसवर आकर्षक उत्‍सवी ऑफर्स देण्यात आल्या आहेत. 
सॅमसंग आपल्या बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसवर विशेष फायदे दिले आहेत. यामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर जवळपास २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळू शकते. ग्राहकांना मनःशांती मिळावी, दुरुस्तीचा अनपेक्षित खर्च कमी व्हावा आणि वस्तू खरेदीचा एकंदरीत अनुभव सुखद व्हावा, हा या फायद्यांमागचा उद्देश आहे.
या शुभ अक्षय्य तृतीया ऑफर्स ३१ मे २०२६ पर्यंत Samsung.com, आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्‍स आणि भारतातील निवडक रिटेल आउटलेट्समध्‍ये उपलब्ध असतील.
स्मार्ट राहणीमानासाठी बीस्‍पोक एआयद्वारे समर्थित
सॅमसंगचे बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेस स्मार्ट, सर्वोत्तम आणि ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. वैयक्तिक गरजांनुसार कूलिंग करण्यापासून कनेक्टेड होम मॅनेजमेंटपर्यंत या अप्‍लायन्‍सेसमध्‍ये प्रगत एआय आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. 
विश्वासार्हता वाढवण्यासाठी, सॅमसंगच्या २०२६ बीस्‍पोक एआय एअर कंडिशनर श्रेणीमध्ये स्मार्टथिंग्स होम केअर एकीकृत करण्यात आले आहे. हे एक प्रो-अॅक्टिव्ह मॉनिटरिंग आणि प्रतिबंधात्मक देखभाल सोल्यूशन आहे, जे अप्‍लायन्‍सच्या कामगिरीचा सतत मागोवा घेते, गॅस गळती किंवा फिल्टर साफ करण्याची गरज यांसारख्या संभाव्य समस्या शोधते आणि वापरकर्त्यांना अलर्ट करते. 
एआय व्हिजन इनसाइड तंत्रज्ञान असलेले बीस्‍पोक एआय रेफ्रिजरेटर्स फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू ओळखून आणि कनेक्टेड इकोसिस्टमशी विनासायासपणे एकीकृत होऊन किचनमधील अन्‍न व्यवस्थापन अधिक स्मार्ट करतात.
सॅमसंगच्या बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्समध्ये एआय वॉश वैशिष्ट्य आहे, जे कपड्यांचे वजन व कापडाचा प्रकार स्‍मार्टपणे ओळखून पाणी, डिटर्जंटचा वापर आणि वॉश सायकल्सचे अचूक नियोजन करते, ज्यामुळे कपडे उत्तमरित्‍या स्‍वच्‍छ धुतले जातात. 
या अप्‍लायन्‍सेसमध्‍ये सॅमसंगचे स्मार्टथिंग्स फॅमिली केअर हे विशेष वैशिष्‍ट्य देखील आहे, जे अॅक्टिव्हिटी नोटिफिकेशन्स, औषधांबाबत रिमाइंडर्स आणि लोकेशन-आधारित अलर्ट्स देते. यामुळे कुटुंबांना उत्तम काळजी, कनेक्टिव्हिटी आणि मनःशांती मिळण्यास मदत होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य