*दत्तमहाराजांना तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य* श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजन


*दत्तमहाराजांना तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य* 
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजन

पुणे : तिळगूळ, गूळ पोळी, तीळ वडी, पापडी, गूळ मोदकाच्या तोरणांनी सजलेले दत्तमंदिर... हलव्याचा नयनरम्य मुकुट आणि सुबक असा हलव्याचा हार, हलव्याचे वाळे, कानातले डूल, पैंजण आणि सुकामेव्याने सजवलेला अंगरखा परिधान केल्यावर दिसणारी दत्तमहाराजांची विलोभनीय मूर्ती पाहण्याकरीता दत्तमंदिरामध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली. मकर संक्रांतीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्त महाराजांना गूळ, तिळगूळ आणि तीळाच्या अनेक पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे यांसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, उपाध्यक्ष प्रणती टिळक यांच्या हस्ते माध्यान्ह आरती संपन्न झाली.

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, मकरसंक्रातीनिमित्त गूळ, तीळ, हलवा, गूळ पोळी, तिळ वडी, पापडी, मोदक, गुळाच्या ढेपी ओवश्याचे साहित्य, पतंग आणि विविध पुष्प रचनांचे साहित्य वापरुन ही आरास केली. मकरसंक्रांतीनिमित्त दाखविलेला तिळगूळ भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. रविवार, दि. १८ जानेवारी रात्रीपर्यंत ही आरास भाविकांना पाहण्याकरीता खुली राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक