सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसने उत्तर प्रदेशमधील १,७५० तरूणांना फ्यूचर-टेक स्किल्‍समध्‍ये प्रमाणित केले


सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसने उत्तर प्रदेशमधील १,७५० तरूणांना फ्यूचर-टेक स्किल्‍समध्‍ये प्रमाणित केले


लखनौ, भारत - जानेवारी १२, २०२६ - सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने नॅशनल युथ डे निमित्त आपल्‍या प्रमुख सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस (एसआयसी) उपक्रमांतर्गत उत्तर प्रदेशमधील १,७५० विद्यार्थ्‍यांना प्रमाणित करण्‍याची घोषणा केली, जो कंपनीच्‍या राज्‍यामधील तरूणांना कुशल करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमधील महत्त्वपूर्ण टप्‍पा ठरला आहे.

लखनौमधील सिटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्‍समध्‍ये प्रमाणपत्र वितरण समारोहाचे आयोजन करण्‍यात आले. याप्रसंगी उत्तर प्रदेश सरकारच्‍या माननीय उच्‍च शिक्षण मंत्री श्रीमती रजनी तिवारी, तसेच शिक्षण प्रमुख आणि उपक्रमाचे सहयोगी उपस्थित होते.

या कोहर्टसह उत्तर प्रदेशमधील सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांची एकूण संख्‍या ३,९०० पर्यंत पोहोचली आहे, ज्‍यामुळे उत्तर प्रदेश या उपक्रमांतर्गत झपाट्याने विकसित होणारे राज्‍य ठरले आहे. सॅमसंगने गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत सहा पट वाढीसह २०,००० विद्यार्थ्‍यांना अपस्किल करण्‍याच्‍या आपल्‍या व्‍यापक राष्‍ट्रीय लक्ष्‍याचा भाग म्‍हणून उत्तर प्रदेशमधील ५,००० तरूणांना कुशल करण्‍याच्‍या हेतूची घोषणा केली. हा उपक्रम सध्‍या १० राज्‍यांमध्‍ये राबवला जात आहे.  

लखनौमधील उपक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (९५० विद्यार्थी), कोडिंग अँड प्रोग्रामिंग (५५० विद्यार्थी), बिग डेटा (१५० विद्यार्थी) आणि इंटरनेट ऑफ थिंग्‍ज (१०० विद्यार्थी) अशा उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमधील उद्योग-संबंधित प्रशिक्षण मिळाले.

''सॅमसंगमध्ये आमचा ठाम विश्वास आहे की, भारतातील तरूण भारताचे भविष्‍य घडवतील. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस उपक्रम एआय, आयओटी किंवा बिग डेटा आणि कोडिंग अशा फ्यूचर-टेक कोर्सेसमधील प्रत्‍यक्ष प्रशिक्षण देत शिक्षण व उद्योगामधील तफावत दूर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. लखनौमध्‍ये १,७५० विद्यार्थ्‍यांच्‍या प्रमाणनामधून भारत सरकारच्‍या स्किलिंग दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याप्रती आणि उत्तर प्रदेशमधील तरूण विद्यार्थ्‍यांना उद्योग संबंधित क्षमतांसह सक्षम करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस आमचा प्रमुख उपक्रम आहे, जो भावी पिढीला सक्षम करण्‍यासोबत चौथ्‍या औद्योगिक क्रांतीसाठी रोजगाराकरिता सुसज्‍ज करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे,'' असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाच्‍या सीएसआर अँड कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन्‍सचे प्रमुख शुभम मुखर्जी म्‍हणाले.

''उच्‍च शिक्षणामध्‍ये बदल होत असताना शैक्षणिक निष्‍पत्ती उदयोन्‍मुख आर्थिक व तंत्रज्ञान गरजांशी संलग्‍न असणे आवश्‍यक आहे. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस उपक्रम महत्त्वपूर्ण मूल्‍याची भर करतो, विद्यार्थ्‍यांना प्रगत डिजिटल माहिती आणि अनुभवात्‍मक शिक्षण देतो. असे सहयोग आमच्‍या संस्‍थांना अधिक प्रबळ करतात आणि उत्तर प्रदेशसाठी माहितीपूर्ण, स्‍पर्धात्‍म कर्मचारीवर्ग घडवण्‍यास मदत करतात. मी तरूणांना सक्षम करण्‍यासाठी आणि भविष्‍याकरिता सुसज्‍ज, कुशल कर्मचारीवर्ग घडवण्‍याच्‍या राज्‍याच्‍या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍यासाठी सॅमसंगच्‍या कटिबद्धतेचे कौतुक करते. आजचे तरूण उत्तर प्रदेशच्‍या प्रगतीचा पाया आहेत आणि भारताच्‍या विकासगाथेमधील प्रेरक स्रोत आहेत,'' असे उत्तर प्रदेश सरकारच्‍या माननीय उच्‍च शिक्षण मंत्री श्रीमती रजनी तिवारी म्‍हणाल्‍या.

२०२२ मध्‍ये भारतात लाँच करण्‍यात आलेला सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस विशेषत: वंचित व अर्ध-शहरी प्रांतांमध्‍ये फ्यूचर-टेक शिक्षण अधिक उपलब्‍ध करून देण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. मान्‍यताकृत प्रशिक्षण सहयोगींच्‍या माध्‍यमातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स सेक्‍टर स्किल्‍स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय) सोबत सहयोगाने हा उपक्रम राबवण्‍यात आला आहे.

राष्‍ट्रीय स्‍तरावर या उपक्रमामध्‍ये ४४ टक्‍के महिलांचा सहभाग आहे, ज्‍यामधून सॅमसंगचा सर्वसमावेशक व समान स्किलिंगवरील फोकस दिसून येतो. टेक्निकल प्रशिक्षणाव्‍यतिरिक्‍त विद्यार्थ्‍यांना कामाच्‍या ठिकाणी सुसज्‍जता सुधारण्‍यासाठी सॉफ्ट-स्किल्‍सबाबत माहिती आणि प्‍लेसमेंटसाठी साह्य मिळते.

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो आणि सॅमसंग दोस्‍त अशा उपक्रमांसोबत सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसमधून भारताच्‍या डिजिटल स्किलिंग ध्‍येयांना प्रबळ व विस्‍तारित करण्‍याप्रती कंपनीची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते.

सॅमसंग न्‍यूजरूम इंडिया: https://news.samsung.com/in/samsung-innovation-campus-certifies-1750-youth-in-future-tech-skills-in-uttar-pradesh 


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक