लोगो) विश्वनाथ स्पोर्ट्स मीट**डी.वाय.आकुर्डी, एटीएसएस, व्हीआयटी पुणेचे दमदार विजय**एमआयटी–एडीटी विद्यापीठातील क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद*

*(लोगो) विश्वनाथ स्पोर्ट्स मीट*
*डी.वाय.आकुर्डी, एटीएसएस, व्हीआयटी पुणेचे दमदार विजय*
*एमआयटी–एडीटी विद्यापीठातील क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद*
लोणी काळभोर :एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएस–२०२६) अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत बुधवारी चुरशीचे सामने खेळविण्यात आले. एमआयटी कॉलेज ग्राउंड आणि निकम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यांत डी.वाय.पाटील आकुर्डी, औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था (एटीएसएस) आणि विश्वकर्मा इस्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी व्हीआयटी पुणे संघांनी प्रभावी विजय नोंदवत आपली ताकद सिद्ध केली.

एमआयटी कॉलेज ग्राउंडवर झालेल्या सामन्यात डी.वाय. आकुर्डी संघाने यजमान एमआयटी एडीटी स्कुल ऑफ कंम्युटींग (एसओसी) ब संघावर १७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत डीवाय पाटील आकुर्डीने १३ षटकांत ५ बाद १०४ धावांची लढाऊ धावसंख्या उभारली. कर्णधार शिवम के. मिश्रा याने केवळ २४ चेंडूत ५ चौकार व १ षटकारासह ४० धावांची आक्रमक खेळी केली, तर अंकुर शर्मा याने २३ धावांची मोलाची साथ दिली. प्रत्युत्तरात एमआयटी एडीटी एसओसी ब संघाला लक्ष्य गाठता आले नाही. यश उंबरे याने ३ षटकांत १६ धावा देत ३ बळी घेत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आणि एमआयटी एसओसी संघ १३ षटकांत ६ बाद ८७ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

निकम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात एटीएसएस संघाने एसबी पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय संघावर ६ गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एसबी पाटील कॉलेजने १७ षटकांत ९ बाद ११३ धावा केल्या. एटीएसएस कडून आदित्य राऊत आणि ऋषी चोरडिया यांनी प्रत्येकी दोन बळी घेत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला, तर तेजस चौहान याने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित बनसोडे (नाबाद ३०) आणि सुजित आवटे (नाबाद १९) यांच्या संयमी खेळीमुळे एटीएसएस संघाने केवळ ११.५ षटकांत विजय मिळवला.

दिवसाच्या तिसऱ्या सामन्यात व्हीआयटी पुणे संघाने सूर्यदत्त बावधन संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करत सूर्यदत्त बावधन संघ अवघ्या ११.४ षटकांत ७७ धावांत गारद झाला. सिद्धांत महाजन (२/७), अथर्व करोडे (२/९) आणि सोहम व्यवहारे (२/१६) यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघ अडचणीत आला. ७८ धावांचे लक्ष्य आदी नेने (नाबाद २६) आणि सोहम कदम (२५) यांच्या खेळीच्या जोरावर व्हीआयटी पुणे संघाने केवळ ८.४ षटकांत सहज पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक : डी.वाय. आकुर्डी : १३ षटकांत ५ बाद १०४ (शिवम के. मिश्रा ४० – २४ चेंडू, अंकुर शर्मा २३ – २१ चेंडू; रोहित लक्कास २/२०, संस्कार बब्बे २/२५) वि.वि. एमआयटी एडीटी एसओसी ब : १३ षटकांत ६ बाद ८७ (ओंकार गोडसे* ३१ – २५ चेंडू; यश उंबरे ३/१६) सामनावीर : यश उंबरे.

एसबी पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय : १७ षटकांत ९ बाद ११३ (आर्यन निलेश १९, हर्षल भेगडे १७; आदित्य राऊत २/२२, ऋषी चोरडिया २/२४) वि.वि. एटीएसएस : ११.५ षटकांत ४ बाद ११७ (रोहित बनसोडे* ३० – २२ चेंडू, सुजित आवटे* १९ – १० चेंडू) सामनावीरः सुजित आवटे. 

सूर्यदत्त बावधन : ११.४ षटकांत सर्वबाद ७७ (धीरज प्रवीण अहिरे १९, संस्कार गायकवाड १५; सिद्धांत महाजन २/७, अथर्व करोडे २/९, सोहम व्यवहारे २/१६) वि.वि. व्हीआयटी पुणे : ८.४ षटकांत ३ बाद ८१ (आदी नेने* २६ – २६ चेंडू, सोहम कदम २५ – १७ चेंडू) सामनावीरः अथर्व करोडे.
--------------------------------

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक