बाल्यावस्थेतील कर्करोगावर मात करणाऱ्या भारतामधील सुमारे 15 बालकांचा टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) मध्ये सहभाग कॅनकिड्स किड्सकॅन, द नॅशनल सोसायटी फॉर चेंज फॉर चाइल्डहूड कॅन्सरद्वारे प्रायोजित
पुणे, जानेवारी 2026:
टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) चे आयोजन रविवार, 18 जानेवारी रोजी करण्यात आले असून त्यात सरासरी 22 वयोगटातील बाल्यावस्थेतील कर्करोगावर मात केलेली (कॅन्सर सर्व्हायवर) 15 बालके सहभागी होणार आहेत.
सलग 16 व्या वर्षी, कॅनकिड्स या ऐतिहासिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होईल. ज्यात बालपणात उदभवणाऱ्या कर्करोगातून बचावलेल्या व्यक्ती, कॅनकिड्स लिडरशीप टीम, कॉर्पोरेट भागीदार आणि स्वयंसेवक सहभागी होतील.
विविध श्रेणींमध्ये सहभागी होत, भारतातील बाल्यावस्थेत जडलेल्या कर्करोगावर मात केलेल्या व्यक्ती म्हणजेच कॅन्सर सर्व्हायवर असलेल्या 15 जणांचा हा दृढनिश्चयी गट अजूनही रोगाशी झुंज देणाऱ्यांसाठी आशेचा एक शक्तिशाली संदेश देणारा ठरणार आहे.
अनेक शस्त्रक्रियांनंतर एक डोळा गमावलेला आणि मुंबईत जीवनरक्षक उपचार घेण्यापूर्वी अनेक राज्यांचा प्रवास केलेला विकाश हा रेटिनोब्लास्टोमामधून वाचलेला व्यक्ती त्यापैकी एक आहे. कॅनकिड्सच्या संपूर्ण पाठिंब्याने, तो आता कॅनकिड्स मुंबई कॅनशाला येथे काम करतो. मुलांना उपचारादरम्यान त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करतो.
टीएमएम 2026 मध्ये कॅनकिड्सच्या वतीने ही अत्यंत हृदयस्पर्शी दृश्य मानवंदना असेल. धावपटू ड्रीम प्लाकार्डस् (Dream Placards) घेऊन जातील. ज्यात मुलांचे छायाचित्र तसेच डॉक्टर, अंतराळवीर, गायक, शिक्षक किंवा सैनिक बनण्याची त्यांची आकांक्षा दर्शविली जाईल.
ड्रीम प्लाकार्डस् (Dream Placards) म्हणजे आकांक्षांचे धावते दालन असले तरी, कॅनकिड्स झोनमध्ये, एक लक्षवेधी होप टाइल्स वॉल – स्वप्नाळू फरशांची एक मोजेक प्रकारातील कलाकृती; जे धावणे का महत्त्वाचे आहे याची एक शक्तिशाली आठवण म्हणून उभे राहील. भागीदार धावपटूंनी उंच धरलेले मोठे आशादायी फलक (होप टाइल बॅनर), कर्करोग असलेल्या प्रत्येक मुलाला पुन्हा स्वप्न पाहण्याची संधी देण्याच्या सामूहिक वचनबद्धतेचे प्रतीक असेल.
कॅनकिड्स लिडरशीप टीममध्ये कर्करोगावर मात केलेल्या व्यक्ति तसेच पाठीराखे मॅरेथॉन बिल्ड-अप आणि शर्यतीच्या दिवशी सामील होईल. संस्थेच्या द्रष्ट्या विचारावर बोलताना, कॅनकिड्सच्या संस्थापिका आणि अध्यक्षा तसेच कॅन्सर सर्व्हायवर असलेल्या पूनम बगाई यांनी सांगितले की:
“भारतातील कर्करोग असलेल्या प्रत्येक मुलासाठी एकात्मिक उपचार तसेच देखभाल मॉडेल तयार करून उपचार, शिक्षण आणि राज्य यांच्यातील अंतर कमी करणे हे आमचे ध्येय आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन आम्हाला एक राष्ट्रीय व्यासपीठ देऊन या प्रवासाला बळकटी देते. जिथे या रोगावर मात करत सावरलेले कॅन्सर सर्व्हायवर मार्ग दाखवतात आणि भीतीपेक्षा आशा अधिक मजबूत असल्याची आठवण करून देतात.”
टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) 2026 च्या माध्यमातून, कॅनकिड्सचे उद्दिष्ट हे बालपणातील कर्करोगाबद्दल राष्ट्रीय जागरूकता वाढवणे, लवकरात लवकर निदानास प्रोत्साहन देणे, काळजी घेण्याची उपलब्धता वाढवणे आणि संपूर्ण भारतात उपचार, पोषण, शिक्षण, समुपदेशन, उपशामक देखभाल (पॅलिएटीव्ह केअर) आणि रोगावर मात केलेल्यांचे सक्षमीकरण (सर्व्हायवर एम्पॉवरमेंट) या माध्यमातून समग्र मॉडेलला समर्थन देणे हे आहे.
Comments
Post a Comment