*प्रत्येक विद्यार्थी हा चांगला नागरिक बनला पाहिजे**निवृत्त हवाई दल अधिकारी अभिजीत खेडकर : सैनिक मित्र परिवाराच्यावतीने खेडकर यांचा सन्मान*


*प्रत्येक विद्यार्थी हा चांगला नागरिक बनला पाहिजे*

*निवृत्त हवाई दल अधिकारी अभिजीत खेडकर : सैनिक मित्र परिवाराच्यावतीने खेडकर यांचा सन्मान*

पुणे : सैन्यासाठी साधनसामग्री अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार होणारी आधुनिक साधने उत्कृष्ट दर्जाची आहेत. मात्र, भविष्याचा विचार करता या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या आपली शिक्षणव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेतून घडलेला प्रत्येक विद्यार्थी हा जबाबदार व सुजाण नागरिक बनला पाहिजे. यासाठी शासनानेही ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे झाले तर पुढील पंधरा वर्षांत भारत विकसित राष्ट्र बनू शकेल, असे मत निवृत्त हवाई दल अधिकारी ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर यांनी व्यक्त केले.

सैनिक मित्र परिवाराच्यावतीने विजयादशमीच्या निमित्ताने पराक्रमी सेनाधिकारी यांच्या निवासी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. निवृत्त हवाई दल अधिकारी ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर यांचा सन्मान त्यांच्या मॉडेल कॉलनी मधील निवासस्थानी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या संयोजनात गिरीश पोटफोडे, कल्याणी सराफ, नितीन पंडीत, सुवर्णा बोडस, शेखर कोरडे, किरण पाटोळे,पराग ठाकूर, विष्णू ठाकूर गिरीजा पोटफोडे यांनी सहभाग घेतला. पुणेरी पगडी, उपरणे, सन्मानचिन्ह देऊन खेडकर यांचा गौरव करण्यात आला.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, वर्तमान काळातील आदर्श व्यक्तींचा सन्मान यानिमित्ताने होत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून सैनिक येतात, एकत्र राहतात याला खरी समरसता म्हणतात. जात, पंथ, भाषा माहित नसते. सैन्यात अवघा भारत एक असतो.

आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिकांसाठी कृतीशील काम करण्याचा प्रयत्न सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. तिरंगी झेंडयासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांच्या प्रत्येक सणाला पहिला मान आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हे सण साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भूमी आणि मातृभूमी यातील फरक जाणून घेण्याकरीता प्रत्येकाने सैनिकाचे जीवन समजून घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

* फोटो ओळ : सैनिक मित्र परिवाराच्यावतीने विजयादशमीच्या निमित्ताने पराक्रमी सेनाधिकारी यांच्या निवासी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. निवृत्त हवाई दल अधिकारी ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर यांचा सन्मान त्यांच्या मॉडेल कॉलनी मधील निवासस्थानी करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.
[05/10, 19:41] Virendra Lokmat: - प्रेसनोट प्रसिद्धीसाठी -
*गिरनार येथील गोरखनाथ शिखरावर मूर्तिभंजनाच्या निंदनीय प्रकारचा तीव्र निषेध*
 
*श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वतीने निषेध*

पुणे : दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र मानलेल्या गिरनार क्षेत्रातील आद्य नाथपंथीय गुरु गोरखनाथ यांच्या मूर्तिभंजनाच्या घटनेचा श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी विकृत मनवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या या लांछनीय प्रकारास जबाबदार असलेल्या समजकंटकांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना तातडीने अटक करून जलदगतीने कायद्यानुसार सख्तपणे शिक्षा करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या रात्री गोरखनाथ शिखरावरील गुरु गोरखनाथ यांच्या मूर्तीची विटंबना करून शिरभंजन करण्यात येवून ती मूर्ती उचलून तेथील मंदिराच्या मागील बाजूस टाकण्याचे घृणास्पद व संतापजनक कृत्य करणाऱ्या गुंडगिरीच्या मानसिकतेचा ट्रस्टचे सर्व विश्वस्त अतिशय कठोर शब्दात निषेध करत आहेत. असंख्य दत्त सांप्रदायिक भाविकांच्या उग्रभावनांना या निषेधपत्राद्वारे व्यक्त करत आहोत.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे यांनी हा निषेध व्यक्त केला आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्री, गुजरात राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांना पाठवण्यात येणार आहे. 
 
हिंदू धर्मातील सर्व समावेशक उपासना आणि सहिष्णूता या मूलभूत तत्वांना पायदळी तुडवण्याचा जो अश्लाघ्य प्रकार झाला आहे त्याची निर्भात्सन करण्यास शब्द अपुरे आहेत. हा अनिष्ठ आणि अनुचित अपराध करणाऱ्या व्यक्ती समाजामध्ये अशांतता निर्माण करून धार्मिक तेढ वाढवत आहेत. या दुःखद प्रसंगी सर्व दत्त भक्तांनी संयम बाळगून कोणताही अनुचित प्रकार घडू देवू नये असे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात येत आहे. दत्त सांप्रदायिक भाविकांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपराधी व्यक्तींना तातडीने अटक करून कायद्यानुसार कारवाई करून कठोर शिक्षा करण्याची आग्रही मागणी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त पुण्यातील सर्व दत्त भक्तांच्या वतीने करत आहोत.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा