बेवफाई' हे हिंदी गाणं दगडूशेट गणपती बाप्पाच्या चरणी लोकार्पण*
*'बेवफाई' हे हिंदी गाणं दगडूशेट गणपती बाप्पाच्या चरणी लोकार्पण*
पुणे : अनेक पंजाबी गाण्यातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री नेहा पटिले पुन्हा एकदा 'बेवफाई' या हिंदी गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. देसी मेकर्स आणि मेहराज सिंग यांची निर्मिती असलेल्या या गाण्याचे दगडूशेट गणपती बाप्पाच्या चरणी लोकार्पण करण्यात आले. यामध्ये नेहा पटिले सोबत आसिफ मलीक हा सहकलाकार असून तो सोशल मीडिया इनफ्लून्सर आहे. या गाण्याला संगीत दिलय फ्रिक सिंग यांनी तर दिग्दर्शन केलयं मेहराज सिंग यांनी.
यावेळी बोलताना अभिनेत्री नेहा पटिले म्हणाली, आज दगडूशेट गणपती बाप्पाच्या चरणी या गाण्यांचे लोकार्पण केलं आहे. 'बेवफाई' हे हिंदी गाणं असून आज पासून ते देसी मेकर्स या युट्यूब चॅनलवर उपलब्ध झालं आहे. आयुष्यात प्रत्येक जण प्रेमात पडतो. तर अनेकांना बेवफाईला देखील सामोर जाव लागतं. त्यामुळे अनेक लोकांना हे गाणं आवडेल अशी अपेक्षा आहे. या गाण्याला खूप खूप प्रेम मिळावे, प्रेक्षकांना ते आवडावे हीच प्रार्थना मी आज बाप्पा चरणी केली आहे.
Comments
Post a Comment