अस्सल मराठी लोककलांच्या जागरात रंगले 'द फोक आख्यान'*- नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांचे आयोजन; आयडियल काॅलनी मैदानावर अवतरली 'मऱ्हाटी' लोकपरंपरा
*अस्सल मराठी लोककलांच्या जागरात रंगले 'द फोक आख्यान'* - नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांचे आयोजन; आयडियल काॅलनी मैदानावर अवतरली 'मऱ्हाटी' लोकपरंपरा पुणे, ता. १६: महाराष्ट्राच्या कणाकणांत भरलेल्या, अस्सल मराठी मातीतल्या लोकपरंपरांचे अत्यंत जोशपूर्ण, प्रभावी आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण असलेले 'द फोक आख्यान' गुरुवारी रंगले. सुमारे अडीच तास, या कलाकारांनी रसिकांना लोककलाप्रकारांचे वैविध्य दाखवत मंत्रमुग्ध केलेच; ठेकाही धरायला लावला. कोथरूड प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका हर्षाली दिनेष माथवड यांच्या पुढाकाराने आयोजित दोन दिवसीय 'कोथरूड सुरोत्सव २०२५'चे पहिले पुष्प फोक आख्यानातून गुंफले. आयडियल कॉलनी मैदानावर रंगलेल्या या लोकोत्सवावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मोनिका मुरलीधर मोहोळ, हर्षाली माथवड, दिनेश माथवड, मंजुश्री खर्डेकर, नीलेश कोंढाळकर, दुष्यंत मोहोळ, अंबादास अष्टेकर, अभिनेता रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. लोककलांचे पारंपरिक प्रकार द फोक आख्यानातून एकापाठोपाठ सादर होत गेले. रिवाजानुसार गणोबाला वंद...