Posts

Symbiosis Expands Global Academic Footprint with University of Limassol, CyprusMoU to boost research, academic exchange and student-faculty mobility

Image
Symbiosis Expands Global Academic Footprint with University of Limassol, Cyprus MoU to boost research, academic exchange and student-faculty mobility Pune:- 23/09/2026: - Symbiosis International University (SIU) has signed a Memorandum of Understanding (MoU) with the University of Limassol, Cyprus, further strengthening its international academic engagement. The collaboration, facilitated through the Symbiosis Centre for International Education (SCIE), will promote joint initiatives in teaching, research, academic exchange and mobility. The MoU was signed on behalf of Symbiosis International (Deemed University) by Dr. Amruta Ruikar, Director, Symbiosis Centre for International Education (SCIE), in the presence of Dr. Anupama S. Kotur (Kaddi), Deputy Director, SCIE, and Prof. (Dr.) Shashikala Gurpur, Director and Dean, Symbiosis Law School, Pune. The signing ceremony was attended by Dr. Amruta Ruikar, Director, SCIE; Dr. Anupama S. Kotur (Kaddi), Deputy Director, SCIE; and Prof. (Dr.) S...

गणेशोत्सवात राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान*शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव

Image
*गणेशोत्सवात राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान* शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते, मंडप परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी भाविकांची गर्दी वाढत असताना कचऱ्याचे प्रमाणही वाढते. अशा वेळी उत्सवाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वच्छता कर्मचारी सातत्याने पार पाडतात. त्यांच्या श्रमाची दखल घेत शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे २२ महिला आणि २८ पुरुष अशा ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना साडी-चोळी, तर पुरुष कर्मचाऱ्यांना पोशाख देऊन गौरविण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष समीर गायकवाड उपस्थित होते. समीर गायकवाड म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात नागरिक आणि भाविकांची मोठी वर्दळ असते. या काळात परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी सातत्याने मेहनत घेतात. उत्सव सुरळीत पार पडण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही मंडळाची सामाजिक जबाबदारी आहे, यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दगडूशेठ' गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य* दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पण ; भाविकांना प्रसादाचे वाटप

Image
*'दगडूशेठ' गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य*  दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पण ; भाविकांना प्रसादाचे वाटप पुणे : श्रीमंत 'दगडूशेठ' हलवाई गणपतीला तब्बल १५१ किलो मोतीचूराचा भव्य मोदकाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. जालना येथील दहिवाळआणि शहाणे परिवारातर्फे हा मोदक अर्पण करण्यात आला असून तो तीन दिवसात साकारण्यात आला.   श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षी उत्सव मंडपात हा भव्य मोदक टेम्पोतून आणण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील परतुर येथील एकनाथराव दहिवाळ यांच्यातर्फे दगडूशेठ गणपतीला हा १५० किलो मोदक सुजाता एकनाथराव दहिवाळ व अमोल रंगनाथराव शहाणे, दिपाली अमोल शहाणे, साक्षी रोहित शहाणे, माहेश्वरी मायरा यांच्यातर्फे अर्पण करण्यात आला. मोतीचूर लाडू, तूप, साखर, ड्रायफ्रुट, केशर असे यामध्ये वापरण्यात आले आहे. सलग तीन दिवस तब्बल ६ कारागिरांच्या मदतीने हा मोदक तयार केला. साक्षी रोहित शहाणे, अमोल शहाणे आणि शहाणे परिवारातर्फे दगडूशेठ गणपतीला नवस ...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.२७)*ग्रीन वर्ल्ड व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजन ; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार सन्मान

Image
*‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.२७)* ग्रीन वर्ल्ड व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजन ; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार सन्मान पुणे : ग्रीन वर्ल्ड आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी रविवार, दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ तसेच ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर आणि आयोजक व लेखक गौतम कोतवाल यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळा नऱ्हे येथील ॲड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर, शैक्षणिक संकुल क्रमांक २ येथे होणार आहेत. ‘गौरव कर्तृत्वाचा’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात शिक्षण, उद्योग, सामाजिक कार्य, बँकिंग, कृषी, प्रशासन आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी तीन सत्रांचे आ...

भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवा निमित्त पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे सुविधा पुरवल्याबद्दल मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांचा सन्मान

Image
 भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवा निमित्त पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे सुविधा पुरवल्याबद्दल मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांचा सन्मान  पुणे कॅम्प येथे नुकताच झालेल्या भगवान वीर गोगादेव जन्मउत्सव पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता पुणे कॅम्प ट्रायलक हॉटेल न्यू मोदीखाना येथे वीर गोगादेव मंदिर पासून मोठ्या उत्साहात बागड मिरवणूक काढण्यात आली.पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने विविध ठिकाणी 500 विद्युत थांबांची रोषणाई साठी परवानगी दिल्याबद्दल व पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये संपूर्ण रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्यात आले. व स्वच्छता त्याबद्दल पुणे शहर मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वीर गोगादेव जन्मोत्सव सजावट आणि रोषणाई चे प्रमुख आणि उत्सव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनुपम बेगी, अर्जुन भाई सोलंकी, चंद्रकांत किसन चव्हाण, रफिक भाई पीरजादे, बिल्लू सारवान, चेतन जेधे, आदी उपस्थित होते.

Team Sportify’s Manish and Rahul Conquer Khardung La Challenge in Ladakh 2026

Image
Team Sportify’s Manish and Rahul Conquer Khardung La Challenge in Ladakh 2026 Pune 23 September 2026:  Two runners from Pune-based running group Team Sportify successfully completed the gruelling 72-km Khardung La Challenge in Ladakh on Friday, September 11, 2026. Manish Dhamange completed the 72 km ultra marathon in an impressive 11:46:25, while Rahul Gurung finished in 12:07:47, successfully completing one of world’s most challenging high-altitude endurance races. The race takes runners through the challenging terrain of Ladakh, including the iconic Khardung La, at an altitude of over 17,000 feet. The extreme altitude, thin air and demanding terrain make the challenge a true test of endurance and mental strength. Their achievement was the result of months of dedicated preparation under Coach Vijay Bansod and Team Sportify, including long runs, hill training, endurance workouts and race-specific preparation. Coach Vijay Bansod said: “Khardung La Challenge is not just a...

श्री वक्रतुंड रथातून 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३४ वे वर्ष ; यंदा देखील दुपारी ४ वाजता सहभागी होणार

Image
*श्री वक्रतुंड रथातून 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३४ वे वर्ष ; यंदा देखील दुपारी ४ वाजता सहभागी होणार पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री वक्रतुंड रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.   सलग चौथ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. यंदाची प्रतिकृती असलेल्या वृंदावन मधील प्रेम मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. मंदिर वास्तुकलेने प्रेरित असा हा रथ तयार करण्यात आला आहे. रथाची संकल्पना भारतीय मंदिर वास्तु केलेवर आधारित असून त्यात पारंपरिक शिल्पकला आणि आधुनिक फॅब्रिकेशनचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.  रथाचे मुख्य आ...