गणेशोत्सवात पारंपरिक वाद्य आणि खेळांची प्रात्यक्षिके पथकांनी समाविष्ट करावी* ढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ महाराष्ट्र ; कार्यकारिणीची बैठकीद्वारे आवाहन
*गणेशोत्सवात पारंपरिक वाद्य आणि खेळांची प्रात्यक्षिके पथकांनी समाविष्ट करावी* ढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ महाराष्ट्र ; कार्यकारिणीची बैठकीद्वारे आवाहन पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असून त्यामध्ये राज्याच्या विविध भागातील ढोल ताशा पथकांचा मोठा सहभाग असणार आहे. त्यामुळे यंदा ढोल ताशांसोबतच आगमन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य आणि तालांचे व खेळांचे सादरीकरण करण्याचे आवाहन ढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ महाराष्ट्र च्या कार्यकारिणीची बैठकीत करण्यात आले. बैठकीत अध्यक्ष पराग ठाकूर, सचिव संजय सातपुते, खजिनदार ॲड. शिरीष थिटे, सदस्य विलास शिगवण, आशुतोष देशपांडे हे पुण्यातून तर अनिरुद्ध देशपांडे (नागपूर) ,अतुल दौंडकर ( पिंपरी चिंचवड) सुभाष लाडे ( मुंबई) सिद्धू जित्ता ( सोलापूर) हे महासंघ पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पुणे शहर अध्यक्ष अक्षय बलकवडे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष विशाल मानकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत कुडक्याल यांची देखील उपस्थिती होती. पराग ठाकूर म्हणाले, गणेशोत्सव आगमन मिरवणुकांमध्ये आणि सोसायट...