महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, यांनी प्रभाग क्र १ व २ तसेच भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राची दिनांक ०९/०६/२०२६ रोजी पाहणी केली.*

 महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, यांनी प्रभाग क्र १ व २ तसेच भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राची दिनांक ०९/०६/२०२६ रोजी पाहणी केली.* 
पुणे शहराच्या उत्तर पूर्व भागातील गढूळ / पिवळसर पाणी तसेच कमी दाबाने व कमी वेळेत होत असलेल्या पाणीपुरवठ्या बाबत या भागातील नागरिक व मा. सभासद यांनी वारंवार केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मा. महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नागपूरचाळ, मुंजाबा वस्ती, धानोरी या भागात व कुरुळी येथे जलशुद्धीकरण प्रकल्पास दिनांक ०९/०६/२०२६ रोजी भेट दिली. यावेळी मा. सभासद श्रीमती अश्विनी भंडारे, मा. श्रीमती संगीता दांगट, मा.श्री. अनिल टिंगरे, मा. श्रीमती नंदिनी धेंडे, मा.श्री. रवी उर्फ हर्षल टिंगरे, मा. श्रीमती शितल सावंत, मा.श्री. सुहास टिंगरे, मा.श्री अनिल सातव, मा. श्री. रामदास दाभाडे उपस्थित होते. सदर भेटी दरम्यान मा. सभासदांनी त्यांचे प्रभागातील पाण्याच्या समस्या मांडल्या. मा. महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये कशा प्रकारे पाणी शुध्द केले जाते याचा पूर्णपणे आढावा घेतला. सद्यस्थितीत गढूळ / पिवळसर पाण्याबाबत तज्ञांची मदत घेऊन सदर तक्रारींचे पुढील दोन दिवसात निराकरण करणेचे आदेश याप्रसंगी दिले. त्यानुसार तज्ञ दिनांक १०/०६/२०२६ रोजी पाहणी करणार आहेत. व तज्ञांच्या पाहणी नंतर व त्यांचा निष्कर्षानंतर त्यावर योग्य त्या उपाय योजना तात्काळ करण्यात येतील. तसेच भामा आसखेड प्रकल्पाच्या वारंवार खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने MSEDCL कडील अधिक्षक अभियंता यांच्या समवेत बैठक आयोजित करणे बाबत मा. महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश दिले. त्याप्रमाणे भामा आसखेड प्रकल्पातून शुध्द पाणीपुरवठा होईपर्यंत यावर अवलंबून असणाऱ्या भागात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तूर्त करू नये असे मा. महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रसंगी सांगितले. या पाहणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप, भामा-आसखेड प्रकल्प व्यवस्थापक रामदास तारु, अविनाश सपकाळ, विजय केळकर, एकनाथ गाडेकर तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील संबंधित अधिकारी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश