उन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित केलेल्या ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’ला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !488 बालकांचा सहभाग, 12 ठिकाणी नियमित संस्कार वर्गांची मागणी !




उन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित केलेल्या ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’ला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

488 बालकांचा सहभाग, 12 ठिकाणी नियमित संस्कार वर्गांची मागणी !


पुणे : भारतीय संस्कृतीत मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नसून समाजाला संस्कार देणारी केंद्रे मानली जातात. याच परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी सनातन संस्था आणि मंदिर महासंघ यांच्या वतीने 9 ते 15 वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गांचे’ आयोजन करण्यात आले होते. मंदिरांच्या सात्त्विक वातावरणात घेण्यात आलेले हे वर्ग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त तर ठरणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रा.विठ्ठल जाधव यांनी दिली.

सनातन संस्था मागील 26 वर्षांपासून विनामूल्य अध्यात्म प्रसाराचे कार्य करत आहे. आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि टीव्हीमध्ये अधिक गुंतत आहेत. अशा वेळी त्यांना चांगले संस्कार, नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

 या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर,भोसरी, सिंहगड रस्ता, जुन्नर, हडपसर, चिंचवड तानाजी नगर,थेरगाव, विश्रांतवाडी, कोथरूड-वारजे,धनकवडी, बिबवेवाडी, शिवाजी नगर, पिंपरीगाव, कोथरूड, बारामती आणि प्राधिकरण या भागात शिबिरे यशस्वीपणे पार पडली. 26 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या शिबिरामध्ये आतापर्यंत 488 बालक सहभागी झाले. 185 पालक समारोपीय सत्रात सहभागी झाले. 12 ठिकाणी नियमित संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी पालकांनी आग्रही मागणी केली आहे.
  पाच दिवसांच्या या प्रशिक्षण वर्गात दररोज 3 तास मुलांना प्रार्थना, नामजप, आदर्श दिनचर्या, चांगल्या सवयी, नैतिक मूल्ये, भारतीय संस्कृती, कथाकथन, आध्यात्मिक खेळ आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे मार्गदर्शन करण्यात आले. विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गांच्या यशस्वी आयोजनात स्थानिक नागरिक,मंदिर विश्वस्त यांसह लोकप्रतिनिधींनी उत्तम सहकार्य केले. 

पालकांच्या अनुभूतीतून संस्कार वर्गांचे महत्त्व अधोरेखित !
काव्या ताडपत्री या बालिकेने सांगितले, “हे शिबिर मला खूप आवडले. ते आणखी काही दिवस असते तर मी नक्की सहभागी झाले असते.” तिच्या आईने प्रतिक्रिया देताना सांगितले, “येथे दिले जाणारे ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. असे मार्गदर्शन अन्यत्र मिळत नाही. दरवर्षी अशा शिबिरांचे आयोजन व्हावे.”
चव्हाण देसाई इस्टेट येथील एका बालिकेच्या मोठ्या बहिणीने सांगितले, “केवळ दोन दिवसांच्या शिबिरामुळेच तिचे मोबाईल पाहण्याचे प्रमाण कमी झाले आणि तिच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागला.”

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना सुसंस्कृत नागरिक बनवण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना, पुणे जिल्ह्यात विविध भागात आगामी काळात सुरू होणाऱ्या संस्कार वर्गांत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणी व संपर्क : (7038713883)


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश