353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुण्यात भव्य युवा कुस्ती मैदान दिमाखात संपन्न* *300 पेक्षा अधिक युवा-युवती मल्लांचा सहभाग*



*353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुण्यात भव्य युवा कुस्ती मैदान दिमाखात संपन्न*  
*300 पेक्षा अधिक युवा-युवती मल्लांचा सहभाग*

*पुणे, दि. 6 जून 2026:* विद्यार्थी कुस्ती परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळ, टिळक रोड, पुणे येथे भव्य युवा कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले. सलग सहाव्या वर्षी या स्पर्धेचे मोठ्या उत्साहात व दिमाखात यशस्वी आयोजन झाले.

शालेय व युवा विद्यार्थी मुला-मुलींमधील कुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित कुस्तीगीरांनी सहभाग घेतला. 300 पेक्षा अधिक युवा व युवती मल्लांनी आपले कौशल्य पणाला लावले.

स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कसबा मतदारसंघाचे आमदार मा. हेमंत रासने, मा. नगरसेवक सौ. रेश्माताई भोसले, नगरसेविका सौ. रुपाली पवार, महाराष्ट्र मंडळाच्या संचालिका सौ.नेहा दामले, ह.भ.प. वस्ताद श्रीकृष्ण बराटे, श्री. राजाभाऊ जोरी, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग पंच डॉ. मदन कोठुळे, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, अ. भा. मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र कोंढरे,मुठा गाव सरपंच शंकर नाना मोहोळ,गुरुवर्य वस्ताद संभाजी अप्पा शिंदे, श्री. सोमनाथ बनकर साहेब यांच्यासह इ. मान्यवर उपस्थित होते.

विजेत्या मल्लांना सन्मानचिन्ह, तर उपविजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष उत्तेजनार्थ दोन उत्कृष्ट युवा व युवती समर्थ लिमन व लावण्य मॅडम ह्या विजेता मल्लांना 'गदा' प्रदान करण्यात आली. तसेच मुलांन मध्ये आदिराज भेगडे, राजवर्धन शिंदे, जय जावळकर, श्लोक खेरटकर, मुलींन मध्ये ज्ञानेश्वरी वीर, रितु कांबळे, आद्या बारटक्के, रिया जाधव हे विजेता झाले 

यावेळी बोलताना ह.भ.प. वस्ताद श्रीकृष्ण बराटे यांनी सध्याच्या काळात कुस्तीचे व नियमित व्यायामाचे महत्त्व विशद केले. आमदार मा. हेमंत रासने यांनी कुस्ती खेळाच्या विकासासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. *युवराज दिसले* , NIS कुस्ती कोच पै. समीर उर्फ श्याम शिंदे, पै. राहुल भरम, श्री. सुनिल पवार, श्री. सचिन वडघुले, श्री. भरतभाऊ गायकवाड, पै. संतोषभाऊ थरकुडे, पै. निलेशभाऊ पवार, पै. सूर्यकांत येनपुरे, पै. रविंद्र पवार, पै. प्रदीप पवार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.

तसेच कुस्ती क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक व Certified NIS Coach पै. निकुंज उभे, पै. सागर मोहोळ, पै. प्रदीप जगदाळे, पै. तुषार गोळे व प्रसिद्ध निवेदक श्री. बाबाजी लिमन सर यांनी स्पर्धेच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश