आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळा उत्साहात संपन्नअध्यात्म, धर्म आणि संविधान मूल्यांचा सुंदर संगम कीर्तनातून उलगडला
आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न
अध्यात्म, धर्म आणि संविधान मूल्यांचा सुंदर संगम कीर्तनातून उलगडला
पुणे – संविधान दिनाचे औचित्य साधत रविवारी सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. विकास प्रतिष्ठान, सुजता महिला मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने आणि भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिकरीत्या संविधानाची प्रास्ताविका वाचन करून लोकशाही मूल्यांप्रती दृढ निष्ठा व्यक्त करण्यात आली.
विकास प्रतिष्ठानचे संस्थापक आणि रिपब्लिकन पक्ष, महाराष्ट्र प्रदेश युक्क आघाडीचे संघटक उमेश कांबळे यांनी स्वागतपर भाषणात सामाजिक कार्याची दिशा मांडली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण मोहीम, तसेच महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे आयोजन हे उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्यातून यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी संविधानाच्या अस्मितेवर, जागर संस्कृतीवर तसेच नागरिकांच्या कर्तव्यांवर मनोगत व्यक्त केले. यामध्ये शिक्षणसम्राट राजेंद्र बांदल, पोलीस पाटील बबनराव दगडे, माजी नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील, रिपब्लिकन पक्षाचे संघटन सचिव परशुराम वाडेकर आणि मा. सभागृह नेते पुणे मनपा बंडू केमसे यांचा समावेश होता.
सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत नामदेवराव मोरे माध्यमिक विद्यालय, बावधन येथील २०० विद्यार्थ्यांना विकास प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यानिमित्त उपस्थित मान्यवरांचा शाल, संविधानाची प्रत आणि ‘संविधान ट्रॉफी’ देऊन सत्कार करण्यात आला. राजेंद्र बांदल, परशुराम वाडेकर, भरत मारणे, विजय दगडे पाटील, किरण दगडे पाटील, निखिल बांदल,कुटुंबीय यांसह, महाराष्ट्र शासन कीर्तन पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. महाराजांनी संविधान विषयावरील प्रभावी कीर्तन सादर करून उपस्थितांचे मनोवेधन केले.
कार्यक्रमास बबनराव दगडे पाटील, सुदामराव मुंडे, राजू मुंडे, राहुल दुधाळे, शैलेंद्र चव्हाण, संगीता आठवले, वैशाली कांबळे, पियुषा दगडे पाटील, दीपक दगडे, गणेश दगडे पाटील, सूर्यकांत मुंडे, स्वराज कांबळे, यशराज, कांबळे, प्रविण ओहळ, विशाल शेलार, विशाल शेळके, अविनाश कांबळे, प्रदीप कांबळे, निलेश कांबळे, बाळकृष्ण कांबळे, तसेच बावधन परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा नेते अभिजित दगडे पाटील, बजरंग दल पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष नितीन महाजन, शिवसेना नेते दत्ताभाऊ दगडे पाटील आणि संदीप वेडे पाटील यांचाही ‘संविधान प्रत ’ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, शीलाताई पठाण आणि दीपक मस्के यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.
Comments
Post a Comment