गुरू नानक मेडिकल फाउंडेशन आणि गुरुद्वारा गुरू नानक दरबार कॅम्प पुणे
गुरू नानक मेडिकल फाउंडेशन आणि गुरुद्वारा गुरू नानक दरबार कॅम्प पुणे यांच्या वतीने, सकाळ सोशल फाउंडेशन, हिराबाई कावसजी जहागीर ट्रस्ट तसेच श्रीमती लक्ष्मिबाई दगडू शेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट यांच्या सहकार्याने, आज दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दत्त मंदिर पंडाल, श्रीमती लक्ष्मिबाई दगडू शेठ हलवाई दत्त मंदिर समोर, सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वितरण, वैद्यकीय तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि हजारोंनी या आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
या उपक्रमाचा उद्देश समाजातील आरोग्य जागरूकता वाढवणे आणि सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे।
Comments
Post a Comment