कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचा नव्या ३ डिलरशीपसह पुण्यात विस्तार
कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचा नव्या ३ डिलरशीपसह पुण्यात विस्तार
पुणे, महाराष्ट्र, 2 डिसेंबर 2025: कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेडच्या इलेक्ट्रिक वाहन विभाग कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडने आज पुण्यात तीन नवीन खास 3S (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर्स) डीलरशिप्सचे उद्घाटन झाले. दापोडी, हडपसर आणि कोथरूड परिसरात ही डिलरशीप्स सुरू झाली आहे. या नव्या विस्तारामुळे कायनेटिकच्या स्वतःच्या शहरात कायनेटिक इव्ही रिटेल आणि सर्व्हिस नेटवर्क लक्षणीयरित्या बळकट करतात आणि या ब्रॅंडच्या राष्ट्रीय प्रसाराच्या धोरणाला वेग देतात.
विश्रांतवाडी येथे अलीकडेच सुरू झालेल्या कायनेटिकच्या पहिल्या खास EV डीलरशिपनंतर ही विस्तार घोषणा करण्यात आली आहे. अशाप्रकारे या कंपनीच्या आता पुण्यात चार डीलरशिप्स झाल्या आहेत. पुणे हे कायनेटिक ऑटोमोटिव्ह वारशाचे जन्मस्थान असल्याने त्याचे आगळे महत्त्व आहे. हा वेगाने होत चाललेला प्रसार एकामागून एक मोठ्या मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या या ब्रॅंडच्या धोरणास बळकटी देतो. डीलरशिप बांधव आणि ग्राहक यांच्याकडून झटपट मिळणारा उत्तम प्रतिसाद हा कायनेटिक ईव्ही श्रेणी, त्यातील इंजिनियरिंगची गुणवत्ता आणि त्यांच्या एक मजबूत EV ईकोसिस्टम उभारण्याच्या दीर्घकालीन वचनबद्धतेतील वाढत्या विश्वासाची साक्ष देतो.
या प्रसंगी बोलताना कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य फिरोदिया म्हणाले, “आमच्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. कारण पुण्यातच कायनेटिकचा वारसा जन्माला आला. या शहरात आज तीन नवीन शोरूम्स सुरू झाली आहेत आणि अशाप्रकारे पुण्यात आता एकूण चार डीलरशिप्स आहेत. यांच्या पाठबळावर आम्ही दर्जेदार इलेक्ट्रिक मोबिलिटी सहजप्राप्य, हवीहवीशी आणि मेड इन इंडिया बनवण्याच्या आमच्या ध्येयाला वेग देत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “आमचे डीलर भागीदार आणि ग्राहक यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे उत्पादन आणि मार्केटची क्षमता याबाबतचा आमचा विश्वास देखील बळावला आहे. वाहनांची डिलिव्हरी आता सुरू झाली असून, त्याने चांगलाच वेग पकडला आहे. आणि कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स पुढे होऊन
Comments
Post a Comment