आँडी इंडियातर्फे ग्राहकांसाठी अशुअर्ड बाय बॅक प्रोग्रॅम
आँडी इंडियातर्फे ग्राहकांसाठी अशुअर्ड बाय बॅक प्रोग्रॅम
पुणे - ऑडी इंडियाच्या देशभरातील डिलरशिप्सनी नवीन अॅशुअर्ड बायबॅक प्रोग्राम लाँच केला आहे.
यामुळे अॅशुअर्ड बायबॅक, एक्स्टेण्डेड वॉरंटी आणि ऑडी ड्राइव्ह शुअर अशा सर्वसमावेशक उपक्रमांच्या
माध्यामतून ब्रँड अपवादात्मक ग्राहक अनुभव देण्याप्रती आणि भारतात लक्झरी ऑटोमोटिव्ह श्रेणीला
प्रगत करण्याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे. ऑडीच्या डिलर नेटवर्कच्या माध्यमातून लाँच
करण्यात आलेला हा उपक्रम पारदर्शकता, स्थिरता आणि हमी देत लक्झरी कार मालकीहक्कामधील
प्रमुख समस्येचे निराकरण करतो.
अॅशुअर्ड बायबॅक प्रोग्राम
ऑडी इंडियाच्या देशभरातील डिलरशिप्सनी नवीन अॅशुअर्ड बायबॅक प्रोग्राम लाँच केला आहे. हा
प्रोग्राम ग्राहकांच्या भावी वेईकल मूल्याला सुनिश्चित करतो, तसेच ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढवतो
आणि सणासुदीच्या काळात मागणीची पूर्तता करतो. ऑडीच्या डिलर नेटवर्कच्या माध्यमातून लाँच
करण्यात आलेला हा उपक्रम पारदर्शकता, स्थिरता आणि हमी देत लक्झरी कार मालकीहक्कामधील
प्रमुख समस्येचे निराकरण करतो.
या प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या वेईकलसाठी हमीपूर्ण भावी मूल्य, तसेच सोपे आर्थिक व विमा
कव्हरेज देण्यात येते, जे मुदतीच्या शेवटी मूल्यामधील कोणत्याही तफावती दूर करतात. हा डिलर-
नेतृत्वित प्रोग्राम लक्झरी गतीशीलतेला महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी अधिक सहजसाध्य आणि
आर्थिकदृष्ट्या विश्वसनीय करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
हमीपूर्ण भावी मूल्य
– ३ वर्षे / ४५,००० किमीनंतर एक्स-शोरूम किमतीवर ६० टक्के.
– ४ वर्षे / ६०,००० किमीनंतर एक्स-शोरूम किमतीवर ५० टक्के.
मुदतीच्या शेवटी लो-ईमएआय बलून फायनान्स पर्याय (फायनान्शियरच्या मंजूरीनुसार).
सहा मॉडेल्सचे विनासायास मालकीहक्क: ऑडी ए४, ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी
ए६, ऑडी क्यू५ आणि ऑडी क्यू७.
एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम
मूल्यवर्धित पर्याय असलेला हा उपक्रम ग्राहकांना अद्वितीय समाधान देतो, तसेच त्यांच्या मालकीहक्क
प्रवासादरम्यान परिपूर्ण संरक्षणाची खात्री देतो.
ठळक वैशिष्ट्ये:
जवळपास १० वर्षांपर्यंतच्या वेईकल्ससाठी सर्व उत्पादन दोषांना कव्हर केले जाते.
व्यापक मायलेज संरक्षणासह कव्हरेज जवळपास २००,००० किलोमीटरपर्यंत दिले जाते.
भारतातील सर्व ऑडी मॉडेल्सवर उपलब्ध.
नवीन कारच्या डिलिव्हरीच्या वेळी किंवा विद्यमान वॉरंटी संपण्यापूर्वी लाभ घेता येऊ शकतो.
ऑडी ड्राइव्ह शुअर प्रोग्राम
धोरणात्मक ड्रायव्हिंग प्रशिक्षण उपक्रम. कार्यक्षमता-केंद्रित कार मालक व ड्रायव्हर्सना सुरक्षित, कुशल व
जबाबदारीने ड्रायव्हिंग करण्यास सक्षम करण्याचा मनसुबा असलेला उपक्रम ऑडी ड्राइव्ह शुअर
ड्रायव्हर्सना प्रगत टेक्निकल कौशल्य आणि सुरक्षितता जागरूकतेसह सुसज्ज करतो. हा उपक्रम भारतातील
रस्ता सुरक्षा अजेंडाला सादर करतो, तसेच आधुनिक वेईकल तंत्रज्ञान आणि ड्रायव्हर सुसज्जतेमधील
तफावत दूर करतो.
ठळक वैशिष्ट्ये:
सर्वोत्तम ड्रायव्हिंग प्रोग्राम, जो सर्व प्रदेशांमध्ये व स्थितींमध्ये जबाबदारीने ड्राइव्ह करण्यास
आत्मविश्वास निर्माण करतो.
वर्कशॉप्स ड्रायव्हिंग कौशल्ये आणि जबाबदार वेईकल हाताळणीला चालना देण्यासाठी डिझाइन
करण्यात आले आहेत.
ग्रूमिंग, वर्तणूक, सुरक्षित ड्रायव्हिंग आणि ऑडी तंत्रज्ञानाबाबत समर्पित चालक प्रशिक्षण, जे ऑडी
ग्राहकांसाठी पूरक आहे, ज्यामधून ऑडीची सुरक्षितता आणि सामुदायिक कल्याणाप्रती
कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.
मालकीहक्क प्रवासामधील प्रत्येक टप्प्याला दृढ करत ब्रँड ग्राहकांचा लक्झरी अनुभव अधिक उत्साहित
करत आहे, तसेच विश्वास, सुरक्षितता व ग्राहक समाधानामध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहे.
Comments
Post a Comment