क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स तर्फे पुण्यात ज्युनियर डॉक्टर्ससाठी पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सिम्युलेशन कार्यशाळांचे आयोजन
क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स तर्फे पुण्यात ज्युनियर डॉक्टर्ससाठी पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सिम्युलेशन कार्यशाळांचे आयोजन
प्रसूतीशास्त्र, नवजात शिशु शास्त्र, बालरोग, वंध्यत्व उपचार आणि अतिदक्षता यामधील प्रगत कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ११ सिम्युलेशन-आधारित कार्यशाळांचे आयोजन
पुणे, १२ सप्टेंबर २०२५: भारतातील प्रीमियम बर्थिंग सेंटर क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांनी पुण्यात प्रथमच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण कार्यशाळांची मालिका आयोजित केली. या उपक्रमाद्वारे ज्युनियर डॉक्टर्सना सखोल सिम्युलेशन-आधारित शिक्षणाद्वारे प्रगत क्लिनिकल कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. १५० हून अधिक ज्युनियर डॉक्टर्स, प्रसूतीतज्ज्ञ, नर्सेस तसेच नामांकित वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील प्रशिक्षणार्थी या कार्यशाळांमध्ये सहभागी झाले. सत्रांचे नेतृत्व क्लाउडनाईनचे वरिष्ठ तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राध्यापक यांनी केले, ज्यांनी आपला समृद्ध अनुभव आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींचे ज्ञान सहभागींसोबत शेअर केले.
एकूण ११ विशेष मॉड्यूल्स आयोजित करण्यात आले, त्यात अॅडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट इन ऑब्स्टेट्रिक्स,बेसिक पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर कोर्स,सिम्युलेशन प्रोग्रॅम इन निओनेटॉलॉजी,
एक्स्ट्रीम प्रीटर्म केअर मॉड्यूल,थेरप्युटिक हायपोथर्मिया इन निओनेट्स,ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सीज – सिम्युलेशन अँड स्ट्रॅटेजीज,ट्रबलशूटिंग इन ऑब्स्टेट्रिक अॅनेस्थेसिया,फर्टिलिटी स्किल्स लॅब: हँड्स-ऑन सिम्युलेशन,रोबोटिक सर्जरी स्किल्स ऑन द सिम्युलेटर (टच | ट्रेन | ट्रान्सफॉर्म),क्रिटिकल अॅप्रेझल – हाऊ टू इव्हॅल्युएट रिसर्च फॉर क्लिनिकल प्रॅक्टिस यांचा समावेश होता.
या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. आर. किशोर कुमार, संस्थापक चेअरमन व निओनेटॉलॉजिस्ट, क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांनी सांगितले “आजच्या वैद्यकीय क्षेत्रात तरुण डॉक्टर्सना केवळ सैद्धांतिक ज्ञान पुरेसे नाही; त्यांना जलद निर्णयक्षमता आणि प्रत्यक्ष उपचार देण्याची कौशल्ये आवश्यक आहेत. जशी एअरलाईन इंडस्ट्रीत सिम्युलेशन प्रशिक्षणामुळे मानवी चुका जवळपास शून्य पातळीवर आल्या आहेत, तशीच नाविन्यपूर्ण पद्धती आरोग्य क्षेत्रात स्वीकारणे अत्यावश्यक आहे. क्लाउडनाईनमध्ये आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा व्यासपीठांची निर्मिती करतो जिथे ज्युनियर डॉक्टर्स आपली कौशल्ये सुधारू शकतात आणि जटिल क्लिनिकल परिस्थितींना आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतात. अशा प्रकारचे प्रशिक्षण केवळ महत्त्वाचेच नाही, तर भारताच्या आरोग्य क्षेत्राच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.”
यावर अधिक बोलताना डॉ. कुमार म्हणाले “या कार्यशाळांमुळे भारताच्या वैद्यकीय प्रशिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाची उणीव भरून निघाली आहे. ज्युनियर डॉक्टर्सना वर्ग खोल्याबाहेर प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची संरचित संधी मिळाली असून, त्यामुळे ते आपत्कालीन परिस्थितींना अधिक सज्जतेने सामोरे जाऊ शकतील, अत्याधुनिक पद्धती आत्मसात करू शकतील आणि अधिक सुरक्षित व प्रभावी आरोग्यसेवा देऊ शकतील.”
Comments
Post a Comment