कल्पक योजना राबविल्यास मराठी शाळा टिकतील : पराग ठाकूरपुरंदरे प्राथमिक विद्यालयात परिसर अभ्यासवर्गाचे उद्घाटनश्री पोटसुळ्या मारुती मंडळाचा अनोखा उपक्रम



पुणे : मराठी शाळांची अवस्था आज खूप बिकट आहेत. विपरित परिस्थिती असली तरी संधी येतात, हे लक्षात ठेवावे. मराठी शाळांनी कल्पक योजना राबविल्यास मराठी शाळा टिकतील, असे मत ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी व्यक्त केले. 
शिवाजीनगरमधील प्रा. नाथ हरि पुरंदरे प्राथमिक विद्यालयात गणेश पेठेतील श्री पोटसुळ्या मारुती मंडळाच्या सहकार्याने परिसर अभ्यासवर्ग हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ठाकूर बोलत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते पियूष शहा, श्रीमंत पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते सचिन पवार, स्वप्नील दळवी, श्री पोटसुळ्या मारुती मंडळाचे अध्यक्ष कुणाल पवार, शाला समिती अध्यक्ष विशाखा भुरके, मुख्याध्यापिक डॉ. लता घोलप, प्रमोद कुदळे, साधना कुदळे आदी उपस्थित होते. परिसर अभ्यास वर्गासाठी मंडळाकडून साहित्य भेट देण्यात आले आहे.
परिसर वर्गामध्ये मुलांना विविध फळे, प्राणी, पक्षी, वाहने, वाहतुकीचे नियम, इंग्रजी महिने, ऋतू, दिशा, ऋतुचक्र, तरंगचित्रे, जलचर प्राणी, भारताचा नकाशा आदी साहित्याद्वारे अभ्यास करता येणार आहे. परिसर अभ्यासवर्गाचा दर वर्षी पहिली ते चौथीतील सुमारे 350 गरीब विद्यार्थांना लाभ होणार आहे, असे कुणाल पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. 
मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पराग ठाकूर म्हणाले, गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांकडे समाज निरुद्योगी म्हणून पाहतो; परंतु मंडळाचे कार्यकर्ते सुशिक्षित आहेत. अशा कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे. 
नवनव्या संकल्पनांमधून विद्यार्थी घडत जातात असे सांगून महेश सूर्यवंशी म्हणाले, शिक्षकांमुळे आजचे विद्यार्थी उद्याचे उत्तम नागरिक घडू शकतात. सध्याची सामाजिक परिस्थिती बघता शाळा-शाळांमधून संस्काराची चळवळ उभी राहिली पाहिजे.
भविष्यातही शाळेला सहकार्य करू अशी ग्वाही कुणाल पवार यांनी या प्रसंगी दिली.
मान्यवरांचा परिचय संध्या पांढरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन दत्तात्रय पोटे यांनी केले तर आभार महावीर काळे यांनी मानले.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना न्यायालयाचा दिलासा**एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय ; सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा